
उमरखेड,अरविंद ओझलवार। मराठवाड्यातून विदर्भात गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनास पकडून तेरा लाखाच्या गुटख्यासह 23 लाखाचा मुद्देमाल जप्त करीत दोन आरोपींना अटक केली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पुसद च्या पथकाने पहाटे पाच वाजता चे दरम्यान उमरखेड ढाणकी रोड वरील गोसी गावंडे महाविद्यालय समोर पार पडली सदर कारवाईने गुटकाव्यवसायिकामध्ये खळबळ उडाली आहे .
मराठवाड्यातील हिमायतनगर येथून पुसद कडे जाणाऱ्या बोलेरो पिकप वाहन क्रमांक एम एच 8120 मधून गुटका वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या सीताफिने सापळा रचून आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान उमरखेड ढाणकी रस्त्यावरील गावंडे कॉलेज जवळ पकडले सदर वाहनात सुगंधी तंबाखू किंमत अंदाजे १३ लाख रुपये व बोलेरो पिकप वाहन किंमत अंदाजे १० लाख असा एकूण 23 लाख 21 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी युनूस खान अन्सार खान वय २९ रा . हिमायतनगर , विक्रम शंकर कराळे वय २३ वर्षे रा . पुसद व सय्यद अमीर सय्यद खमर वय 45 वर्षे राहणार हिमायतनगर यांच्यावर अन्न औषध प्रशासन चे अन्न सुरक्षा अधिकारी अमित उपलप यांच्या फीर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला . यात युनूस खान कासार खान व विक्रम कराळे या दोघांना अटक करण्यात आली .
ही कारवाई पुसद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स. पो. नि. गजानन गजभारे ,पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड, रेवण जागृत, कुणाल फंडोकार, सुभाष जाधव, तेजाब रणखांब, रमेश राठोड, ताज मोहम्मद,सुनिल पंडागळे यांनी पार पाडली असून या कारवाईमुळे अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू माफियाचे धाबे धाबे दणाणले आहे .
