नवीन नांदेड। मराठा आरक्षण समर्थनात मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी २८ आक्टोबर रोजी सायंकाळी विष्णुपुरी मध्ये मराठा आरक्षणासाठी दंत मंदिर मठा मधून मेणबती कॅण्डल रॅलीमध्ये गावातील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी होते यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे, आरक्षण मिळाले पाहिजे घोषणा दिल्या, मोठया प्रमाणात सहभागी समाज बांधवामुळे परिसर दणाणून गेला.
जालना अंतरवली सराटी येथे मनोज पाटील जरांगे यांच्या उपोषणाचा समर्थनात विष्णुपुरी येथे २८ आक्टोबर रोजी सायंकाळी कॅण्डल रॅली काढण्यात आली होती सदरील रॅली दत मंदीर संस्थान येथुन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मशाल ज्योत पेटवून ,भगवा ध्वज,समाज बांधवांचा हाती असलेल्या कॅण्डल पेटवून हि रॅली दुर्गवाडा,खालची गल्ली,हनुमान मंदीर,मुख्य रस्ता,नवी आबादी मार्ग जिल्हा परिषद हायस्कूल दत मंदीर येथे आली,यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी ,गावातील जेष्ठ नागरिक, युवक,युवती,यांचा सह सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील मराठा समाजातील सर्व समाज मोठया संख्येने उपस्थित होता.
या रॅली मध्ये जय जिजाऊ,जय शिवाजी,आरक्षण आमच्या हक्काचे, आरक्षण मिळाले पाहिजे, यासह विविध मागण्या संदर्भात घोषणा देण्यात आल्या, विष्णुपुरी ग्रामपंचायत यांच्या मराठा आरक्षण संदर्भात ठराव घेण्यात आला तर राजकीय पुढा -यांना गावबंदी करण्यात आली आहे,तर २९ आक्टोबर विष्णुपुरी ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोटार सायकल रॅलीचे आयोजन व जिल्हाधिकारी कार्यालय येथील साखळी ऊपोषणात सहभाग घेणार आहेत.यावेळी मराठा आरक्षण संदर्भात बलीदान दिलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात येऊन शपथ देण्यात आली, राष्ट्रगिताने या रॅलीचा समारोप करण्यात आला.