हिमायतनगरात महिला मंडळीकडून बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
हिमायतनगर,आकांक्षा मादसवार। वारकरी संप्रदायाचे जेष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना हिमायतनगर रुक्मिणीनगर परिसरात स्थापन करण्यात आलेल्या शारदा मातेजवळ आयोजित भजन कीर्तन कार्यक्रमात महिला मंडळींकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी नवी मुंबईती नेरूळ इथे अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाची माहिती मिळताच हिमायतनगर येथील रुक्मिणी नगर परिसरात स्थापन करण्यात आलेल्या शारदा मातेच्या पेंडॉलमध्ये महिला भजनी मंडळाच्या वतीने हरिपाठ व भजनाच आयोजन करण्यात आले. सुरुवातीला बाबा महाराज सातारकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व महिला वारकरी मंडळीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर हरिपाठ आणि भजन कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी भजनाच्या कार्यक्रमात हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्य लताताई पाध्ये व ज्येष्ठ गायिका सुवर्णा काकू जन्नावार यांनी टाळ मृदंगाच्या वाणीत भारुड गाईलं. तर इतर महिला मंडळींनी हरिपाठ व भजनात सहभाग घेतला सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ.संगीता साखरकर, सौ चंद्रकलाबाई गुंडेटवार, सौ.उषाताई देशपांडे, सौ सुनंदा दासेवार, सौ. प्रेमलाबाई गुंडेवार, सौ. मालाबाई भिसेकर, सो. ज्योती गुंडेवार, सौ ज्योती पार्डीकर, आदींसह रुख्मिणी नगर भागातील शारदा देवी मंडळाच्या महिलां मोठया संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.