आरक्षण मिळणारच आहे,,, पण तुम्ही आत्महत्या करू नका – मनोज जरांगे पाटील यांचं तरुणांना आवाहन
नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार। 40 दिवसानंतर सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावच लागेल. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. परंतु कामारी येथील तरुणाने आत्महत्या केली, तरुणांनो अश्या प्रकारे तुम्ही आत्महत्या करू नका असे आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तरुणांना केले.
यावेळी पुढे बोलताना मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला 50 टक्के आरक्षण तर मिळणार आहे. जर तुम्ही अश्याप्रकारे आत्महत्या करत असाल तर आरक्षणाचा फायदा कोनाला होणार. त्यासाठी तरुणांनो आपल्या न्याय हक्कासाठी लढायला शिका, आपला लढा हीच आपली ताकद आहे. इथं काय बोलावं हे मला कळेना तुमच्या गावाच एक लेकरू गेल, आरक्षण तर मी यांच्या छाताडावर बसून घेणार त्याची तुम्ही काळजी करू नका. परंतु तुम्ही आत्महत्या करू नका… अशी जनजागृती तुम्ही गावागावात करा. कारण असे जर तुम्ही आत्महत्या करू लागले तर हा आरक्षण द्यायचं कोणाला. मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की, कामारी येथील त्या कुटुंबाला उघड्यावर पडू देऊ नका… मला फक्त एवढाच शब्द तुमच्याकडून पाहिजे.
सरकार काय मदत करेल याचं मला माहित नाही कामारी गावच्या सुदर्शन देवराये या युवकांन समाजासाठी जे बलिदान दिले हे बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही. सरकारला आपण वेळ दिला त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देणे बंधनकारक आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमा झाला हे पाहून मला काय..? बोलावं कळत नाही. या गावात घडलेल्या घटनेमुळे त्या कुटुंबावर झालेला आघात तुमच्या डोळ्यातील वेदना त्या आई- वडिलांच्या डोळ्यातील अश्रू बगवत नाहीत. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा एल्गार त्यांनी पुकारला.
आरक्षण अंतीम टप्प्यात आले आहे, सरकारने आपल्याकडून वेळ मागितला. कायदा पारित करायला वेळ लागतो त्यासाठी म्हणून आपण 40 दिवसाचा वेळ दिला. त्यानंतर अंतरवली येथे संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे. सरकारला मराठा समाजाला 50 टक्के आरक्षण देऊन कुणबी प्रमाणपत्र देणं भाग आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवानी आंदोलन करताना शांततेत आंदोलन कराव… कुठे जाळपोळ करू नका… आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका…. सरकारला मराठा समाजाला आरक्षण हे द्यावच लागेल आणि ते घेतल्याशिवाय मराठा समाज स्वस्त बसणार नाही. असा ठाम विश्वासही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांनी दिला.