श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| हिंगोली लोकसभा निवडणुकी नंतर महाविकास आघाडीतील (उबाठा) चे नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर हे प्रथमच माहूरगड येथे दि.१९ रोजी आले असताना त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत सर्व विभाग प्रमुखांचा आढावा घेत विविध विकास कामाचा लेखाजोखा घेत दत्तशिखर व मलावाडा घाटातील वनजमिनी संदर्भात माहिती घेतली असल्याची माहिती विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतिबा खराटे यांनी दिली आहे.
दिल्ली येथिल संसदेत पावसाळी अधिवेशनास सुरूवात होणार असल्याने त्यांनी तातडीने माहुरगड तीर्थक्षेत्र विकास आराखडा या संदर्भात दतशिखर,महसुल व राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांना वनविभागाच्या जमिनीच्या वादामुळे विकास कामांना खिळ बसत असल्याने दि.१९ रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या समवेत विभाग प्रमुखांची आढावा बैठक आयोजित करून बैठकीत विकास कामाच्या संदर्भात माहिती घेतली.
लोकसभेचे पावसाळी अधिवेशन संपताच किनवट- माहुर विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार असल्याची माहिती ज्योतिबा खराटे यांनी दिली आहे. या आढावा बैठकीस साह्यक जिल्हाधिकारी मेघना कावेली, तहसीलदार किशोर यादव, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद संजय शिंदे, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहीत जाधव, तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे , उपविभागीय अभियंता देवराव भिसे,रवी उमाळे,अकाश राठोड पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांचेसह अदी अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
खासदार नागेश पाटील हे पहिल्यांदाच माहुर येथे आले असताना यावेळी कपिल नाईक नगराध्यक्ष फिरोज दोसानी, ॲड. यश खराटे,नामदेव कातले,मारोती दिवसे पाटील,भरवडे,निरधारी जाधव,नितीन कन्नलवार,जितु चोले,सुरेखा तळणकर,सुशिल जाधव,डाॅ.निरंजन केशवे,जब्बार भाई वाईकर यांच्यासह किनवट-माहूर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यांनी त्यांचे स्वागत केले.