सिडको स्मशान भुमि दुरावस्था, माजी उपमहापौर विनय पाटील यांनी राबविली स्वच्छता मोहीम…

नवीन नांदेडl मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या सिडको स्मशानभुमि मध्ये झालेल्या दुरावस्था प्रकरणी अखेर माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांनी तात्काळ जेसीबी साह्याने व स्वच्छता कर्मचारी यांच्या मार्फत परिसरातील स्वच्छता व चिखलाचे झालेले मैदान गिटी यांच्या सहायाने परिसर कायापालट केला जवळपास साह तास चाललेल्या अभियान मुळे परिसर स्वच्छ व सुंदर झाला, या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले.
सिडको परिसरात असलेल्या एकमेव असलेल्या या स्मशान भुमि मध्ये अंत्यसंस्कार करावयास आल्यानंतर अनेक अडचणी मयताच्या नातेवाईक यांना तोंड द्यावे लागत होते, तर परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल, घाणीचे साम्राज्य, दुरंगधी,यामुळे मोठया प्रमाणात अडचणी जाणवत होत्या, अखेर १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, पत्रकार व बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी व साफ सफाई कर्मचारी यांच्या उपस्थितीत पाहणी करून तात्काळ चिखल झालेल्या भागात गिटी टाकून तर जेसीबी साह्याने परिसरातील भागातील साफसफाई करून घेतली तर भागात असलेल्या अनेक ठिकाणी केरकचरा व घाणीच्या साम्राज्य असलेला परिसर तात्काळ साफसफाई कर्मचारी यांच्या मार्फत स्वच्छ करून घेतला.
जवळपास तीन ते चार तास झालेल्या या अभियाना मुळे स्मशानभुमि स्वच्छ सुंदर झाली,या काया पालट झालेल्या ऊपकमाचे अनेकांनी अभिनंदन केले. या कामी मनपाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे,कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी,स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक,विभाग प्रमुख वसीम तडवी यांनी सहकार्य केले व तात्काळ गिटी उपलब्ध करून दिली तर साफसफाई कामगार यांनी परिसर स्वच्छ केला.
