
नांदेड/हिमायतनगर, दत्ता शिराणे। सोनारी फाटा शिवारात लिंबाच्या झाडाखाली एका हाॅटेल कामगाराचा मृतदेह आढळून आला आहे. हि घटना दि. ३ सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी फाट्यावर एका चहा पाण्याच्या हाॅटेल वर वाळकी बा. येथील गणेश विठ्ठलराव सावते हा कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो कामावर येत नव्हता, अशीच भटकंती करूण दिवस काढीत होता. दरम्यान सोनारी फाटा शिवारात एका लिंबाच्या झाडाखाली तो मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहीती मिळताच काही नागरिकांनी ही बाब सोनारीचे पोलीस पाटील गजानन महामूने यांना कळवली. पोलीस पाटील महामूने हे घटनास्थळी दाखल होवून हिमायतनगर पोलीस ठाण्याला घटनेची माहीती दिली.
प्राप्त माहितीनुसार हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अशोक सिंगणवाड, पो.काॅ.नितीन राठोड हे दाखल होवून घटनास्थळ पंचनामा करूण प्रेत उत्तरीय तपासणी साठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान मयत गणेश विठ्ठलराव सावते यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून हिमायतनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास जमादार अशोक सिंगणवाड हे करीत आहेत.
