नांदेडलाईफस्टाईल

डिसेंबर अखेर हिमायतनगरची नळयोजना कार्यान्वित करा – आ.माधवराव पाटील जवळगावकरांनी दिली ठेकेदारास डेडलाईन

हिमायतनगर,अनिल मादसवार| शहराच्या १९ कोटीच्या नळ योजनेच्या संदर्भात आज दि.२० सोमवारी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नळयोजनेचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदार, अभियंता व मुख्याधिकारी व संबंधितांची संयुक्त आढावा बैठक घेतली. या बैठकीत मंजूर नळ योजनेच्या कामकाजाची परिस्थिती व रखडलेल्या कामाचा आढावा जाणून घेऊन संबंधित ठेकेदाराला येत्या डिसेंबर अखेर नळ योजनेचे काम पूर्ण करा अशी डेडलाईन संबंधित ठेकेदारला दिली आहे. नळयोजनेचे काम पूर्ण करून जनतेला पाणी मिळाले नाहीतर पाणी टंचाईमुळे संदर्भामध्ये उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी तुम्हाला स्वीकारावी लागेल असा कडक इशाराही आ.जवळगावकर यांनी दिला आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम मार्गी लागणार असल्याची अपेक्षा जनतेला लागली आहे.

हिमायतनगर शहर तालुक्याचे ठिकाण आहे, शहरातील जनता ५० वर्षांपासून पाणी पुरवठा नळयोजनेच्या प्रतीक्षेत आहे. आत्तापर्यंत शहरात मंजूर झालेल्या योजना संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी फस्त शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हि बाब लक्षात घेऊन हिमायतनगर येथे राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेची तहान भागावी म्हणून १९.५९ कोटीची नळयोजना सण २०१८ रोजी प्रशासकीय ठराव घेऊन मंजूर करण्यात आली होती. सदरील नळयोजनेचे काम गेल्या सहा ते सात वर्षांपासून सुरूअसून, कामाला गती मिळत नसल्यामुळे शहरवासीय नागरिकांना दिवाळीच्या पर्व काळापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांसह जागरूक पत्रकारांनी हा प्रकार आमदार जवळगावकर यांच्या लक्षात आणून दिला. त्या संदर्भातील वृत्त प्रकाशित केल्यानंतर आज दिनांक २० सोमवारी येथील शासकीय विश्राम ग्रहात पाणीपुरवठा नळ योजनेच्या संदर्भाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला हिमायतनगर नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी सूर्यकांत ताडेवाड, प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद, एस.एच जवळेकर, बी.आर.राठोड, एस.एस.चिकोडे, एन.जी.भास्कर, अशोक भालेराव, चंचलवाड, ठेकेदार एम.टी.फड, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, संजय माने, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

प्रत्यक्षात ७ वर्षांपूर्वी सुरुवात झालेल्या नळयोजनेचे काम अजूनही अर्धवट अवस्थेत असल्याने शहरातील नागरिकांना दिवाळीच्या पर्वकाळात पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. नळयोजनेचा काम सुरु होण्यापूर्वी शहराच्या चारही बाजूने ४ ते ६ ठिकाणी पाण्याची टाकी उभारणे अनिवार्य होते. काम सुरु झाल्यापासून केवळ तीन टाक्या उभारण्यात आल्या. त्याचेही काम अर्धवट स्थितीत असून, एकाच ठिकाणी दोन टाक्या बांधल्या असल्याचे प्रत्यक्षात दिसते आहे. त्यामुळे जनतेला पाणी टंचाईची भीषणता आत्तापासून जाणवत असल्याने 19 कोटींतील 80 टक्के रक्कम खर्च होऊन हिमायतनगरची जनता तहानलेली; पाणी मिळाले नाहीतर एकमेकांचे डोके फोडून घेण्याची वेळ येणार अश्या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून ऐरणीवर आलेल्या हिमायतनगर शहराच्या पाणी टंचाईचा मुद्दा मंडल होता. याची दाखल घेऊन आज दि.२० रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी पाणी पुरवठा नळयोजनेच संदर्भात आढावा बैठक घेतली.

या बैठकीत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत हिमायतनगर शहरासाठी मंगरूळ येथून राबविण्यात येणाऱ्या नळयोजनेत आत्तापर्यंत मंगरूळ येथील रॉ वाटर पंप हाउस येथील पंपिंग मशनरी (मेकानिकल, इलेक्ट्रिकल) अनुषंगिक सर्व कामे, रॉ वाटर पंपहाउस पासून रायजिंग मेन पाईपलाईन चे गॅप जोडणे, रॉ वाटर राइजिंग मेन पाईप लाईन वरील एअर व्हॉल बसविणे, हिमायतनगर शहरामध्ये रायजिंग मेन पाईपलाईन जलशुद्धीकरण केंद्र पर्यंतचे गॅप जोडणे, बोरगडी रोड येथील 02 जलकुंभ, फुलेनगर-जलकुंभ, दारउलडउलुम-जलर्कुभ साठी इनलेट, आउटलेट पाईप जोडणे, व्हॉल बसविणे, रेलिंग करणे, लेव्हल ईंडीकेटर बसविणे, चेंबर बनिविणे, कलरिंगचे काम करणे, जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी एरियशन फाऊनटनचे टाईल्स बसविणे, फिल्टर पिडीया, सेटलर, ऐअर ब्लोअर मशनरी, व्हॉल, चेंबर, तुरटी, ब्लिचिंग पावडर वापर करणेसाठी आवश्यक ती पंप मशीन बसविणे, वॉश आऊट साठीचे व्हाल, पंप मशनरी बसविणे, दारे -खिडकी बसविणे, कलरिंग व अनुषंगिक सर्व कामे करणे, जलशुद्धीकरण केंद्र येथील प्यूअर वाटर पंप हाउस मधील पंपिंग मशनरी बसविणे, मेकानिकल कामे करणे,  प्यूअर वाटर पंप हाउस पासून पाण्याचे टाकी (जलकुंभ) भरणे साठी पाईप करणे, शहरातील विविध भागात टाकण्यात आलेली एचडीपीइ पाईप लाईनचे गॅप जोडणी करणे, वाटर पंप हाउस आणि प्यूअर वाटर पंप हाउस येथील दारे, खिडक्या बसविणे आणि रॉ वाटर पंप हौस येथील दारे -खिडक्या बसविणे कलरिंग करणे, अनुषंगिक सर्व कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. हि सर्वकामी तातडीने पूर्ण करून येत्या डिसेंबर अखेर नळयोजना कार्यान्वित करून जनतेला घराघरात नळ जोडणी द्यावी अश्या सूचना आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिल्या.

तुमच्या काही अडचणी आम्हाला सांगू नका – जनतेला पाणी मिळल पाहिजे -आ.माधवराव पाटील जवळगावकर
हिमायतनगर शहरातील जनतेला यावर्षी १०० टक्के पाणी टंचाई भासणार आहे, त्यामुळे येणाऱ्या डिसेंबर अखेर पाणी पुरवठा नळयोजना सुरु करून जनतेला पाणी मिळल पाहिजे. जे जे काम शिल्लक आहे ते ते काम लवकरात लवकर पूर्ण करून जानेवरीमध्ये जनतेला कनेक्शन द्या. ज्या वॉर्डातील जेवढं काम शिल्लक आहे ते पूर्ण करून पाणी उपलब्ध करून द्यावे, तुमच्या काही अडचणी आम्हाला सांगू नका. तात्काळ काम पूर्ण करा अश्या सूचना दिल्याचे हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!