नायगाव, रामप्रसाद चन्नावार। कलीयुगात संयमीत जीवना पेक्षा स्वैराचार वाढत आहे व स्वैराचाराने संस्कृती टिकत नाही याचा परिणाम समाजावर होऊन समाज दिशाहिन होतो रामाचे चरित्र श्रवण केल्याने त्याग भाव व संयम निर्माण होऊन स्वैराचाराचा नाश होतो असे विचार ह भ प सुनील महाराज आष्टीकर यांनी राम कथेतुन सांगुन श्रोत्यांचे मने जिंकली.

सोप्या पद्धतीने विकारी मन ताब्यात घेऊन समता कळाली पाहिजे व याची समाजाला गरज आहे. हे हि महाराजांनी सांगितले. आपलं आपण खाणं हि प्रकृती आहे. दुसर्‍याच हिसकावून खाण हि विकृती आहे. आणि आपल्यातला काही भाग इतरांना देण हि भारतीय संस्कृती आहे. म्हणुन संयमीत जीवन जगा असा मोलाचा संदेश ह भ प सुनील महाराज आष्टीकर यांनी रामकथेतुन श्रोत्यांना दिला. श्रोत्यांचा भरगच्च प्रतिसादाने राहेर परीसरात प्रती पंढरपुराचं दर्शन होत आहे. महंत रुद्रगीर महाराज यांनी रामकथेस भेट देऊन आशिर्वचन दिले.

उत्तम संगीत साथ तबलावादक श्रीनिवास कुलकर्णी सिंथ वादक माऊली महाराज गायन मनोज महाराज गोंदिकर व झाकि दर्शन भरत महाराज उपाध्ये परभणी हे करत आहेत. गावकर्‍यांच्या अथक परिश्रमातून सप्ताह यशस्वी होत आहे. श्रीक्षेत्र राहेर येथे सुरू असलेल्या अष्टीकर महाराजांच्या श्रीराम कथेला अप्रचंड प्रतिसाद मिळत आहे येथे 22 जानेवारी रोजी आयोजित प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत असल्याने त्याच धर्तीवर या श्रीराम कथेचे आयोजन श्रीक्षेत्र राहेर येथील समस्त गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात आले आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती लाभत आहे.

ह भ प अष्टीकर महाराज यांनी आपल्या कथेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून सुरू ठेवले आहे आपला समाज सुखी व्हावा आनंदी राहावा प्रत्येकाचे मन प्रसन्न व्हावे प्रत्येकाच्या मनात प्रभू श्री रामाचा सहवास असावा असा त्यांचा अट्टाहास आहे व्यसनाधीन झालेला तरुण धर्म मार्गाला लागावा बालपणापासूनच मुली मुलांवर चांगले संस्कार व्हावेत या दृष्टिकोनातून त्यांचे कथेच्या माध्यमातून कार्य सुरू आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version