उमरखेड, अरविंद ओझलवार। आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन व हिंगोली लोकसभा मतदार संघ आघाडीच्या कोट्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्याच वाट्याला येणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्यामुळे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा दिनांक १९ मार्च मंगळवार वेळ ११ वाजता रोजी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड येथील शासकीय विश्रामगृहा समोरील मैदानात जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला उद्धवजी ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत खा. अरविंद सावंत विरोधी पक्ष नेते अबांदास दानवे माजी खासदार सुभाषराव वानखेडे , माजी. सहकार मंत्री जयप्रकाश मुदडा माजी मंत्री संजय देशमुख माजी आमदार श्रीकांत मुनगिनवार संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड महिला जिल्हा आघाडी च्या व हिंगोली लोक सभेतील यवतमाळ जिल्हातील पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटा कडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघावर बहुतांश वेळा शिवसेनेचीच पकड राहिली असून मागील काही काळात एकनाथ शिंदे यांच्यासोबत हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील व राज्यातील शिवसेनेचे अनेक खासदार आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यासोबत अचानक दगा फटका करून गेल्यापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ही उमरखेड विधानसभा मतदारसंघातील ही पहिली सभा असल्याचे सांगण्यात येत आहे हिंगोली लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो बहुतांश वेळा या लोकसभा मतदारसंघावर जास्तीत जास्त वेळा वर्चस्व शिवसेना उद्धव ठाकरे यांचेच वर्चस्व राहिले आहे आणि हा बालेकिल्ला आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील साबुत ठेवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असंख्य शिवसैनिक हे मागील कित्येक काळापासून पक्ष वाढीसाठी जीवाच रान करीत असून आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील हिंगोली लोकसभा मतदार संघ कायमच ठाकरे गटाच्या हाती राहावा म्हणून ठाकरे गटाकडून जय्यत तयारी करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
सभेला हिंगोली लोकसभा मतदार संघातील तब्बल तीन विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेसह महाआघाडीतील विविध पक्षाचे कार्यकर्ते व स्थानिक पातळीवरील नेते मोठ्या संख्येने या सभेला येणार असल्याची माहिती माजी आमदार तथा नांदेड जिल्हा प्रमुख नागेश पाटील आष्टीकर यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे प्राचार्य मोहनराव मोरे यांनी सर्व माता भगिनी व शेतकरी बांधवांनी तसेच शिवसेना व महाआघाडीतील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित उमरखेड महागाव ‘ हदगाव हिमायनगर , किनवट माहुर विधान सभा क्षेत्रातील राहण्याचे आवाहन केले आहे .
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील हे ठाकरे सेनेला दगा फटका करून शिंदे गटात दाखल झाल्यामुळे या बाबतीत उद्धव ठाकरे कुठल्या पद्धतीने व काय बोलणार याकडे संबंध हिंगोली लोकसभा मतदार संघातील ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचे व सामान्य नागरिकांचे लक्ष लागल्याचे दिसत असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी प्रमुख पत्रकाद्वारे कळविले आहे. सभा अधिक यशस्वी करण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे उपजिल्हाप्रमुख शाखा भरवाडे प्राचार्य मोहणराव मोरे ॲड.बळीराम मुटकुळे , प्रशांत पत्तेवार , तालुकाप्रमुख सतीश नाईक , राजेश खामनेकर , गजेंद्र ठाकरे रविद्रं भारती तथा शिवसेना कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.