उमरखेडराजकियहिंगोली

भाजपाकडून विकासकामांचा लेखाजोखा; उमरखेड – महागाव विधानसभा सर्वांगीण विकास !

उमरखेड, अरविंद ओझलवार। उमरखेड – महागाव विधानसभेत आरोग्य , रस्ते , शिक्षण , पाणी व शेतकऱ्यांच्या सर्व मूलभूत घटकावर विकास कामे करण्यात आली असून मागील दोन वर्षात जवळपास दोन हजार कोटी रुपयांची कामे सुरू असल्याने उमरखेड व महागाव तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी कडून करण्यात आला असल्याची माहिती भाजपाचे यवतमाळ – पुसद जिल्हा समन्वयक नितिन भुतडा व आमदार नामदेव ससाने यांनी दिली .

भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ – पुसद जिल्हा समन्वयक नितिन भुतडा यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मागील दोन वर्षाचा तालुक्याच्या विकासा संदर्भातचा लेखाजोखा भाजपाकडून मांडण्यात आला . या पत्रकार परिषदेला आमदार नामदेव ससाने , नितीन भुतडा ,महेश काळेश्वरकर , सुदर्शन पाटील रावते, किसनराव वानखेडे मरसुळकर , अजय पुरोहित उपस्थित होते .

मागील दोन वर्षात महाराष्ट्र शासनाकडून निधी खेचून आणण्यात उमरखेड विधानसभा अग्रेसर ठरली असून नुकतेच पुसद ते हरदडा ५८ किमी पर्यंतचा २४१ करोड रुपयाचा रस्ता हा मंजूर झाला आहे . त्याचे टेंडर हि निघाले आहे . हा रस्ता हॅम योजनेमधून मंजूर झाला असून या योजनेतून २४१ कोटीचा पुसद -हरदडा रस्ता तर याच योजनेतून विडुळ ते देवसरी या १९ किलोमीटर अंतरासाठीचा ७६ कोटी रुपयांचा रस्ता मंजूर झाला असल्याने महाराष्ट्रात उमरखेड विधानसभा हा एकमेव मतदार संघ आहे जिथे दोन रस्ते मंजूर करण्यात आले आहे .

मागील दोन वर्षात राज्यात महायुतीचे सरकार आले तेव्हापासून साधारणत: उमरखेड विधानसभेत तीनशे किलोमीटरच्या विविध रस्त्यांना मंजुरी मिळवुन कामे सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये छोट्या मोठ्या पावसाने विधानसभेतील अनेक रस्ते बंद पडत होते त्यामुळे उमरखेड विधानसभेतील 30 पुलांना मोठे पूल करण्याचे मंजुरी झाली असून कामे सुरू आहेत . या दोन वर्षातली विशेष बाब म्हणजे बंदीभागात स्वातंत्र्यानंतर रस्त्याची कामे झाली नाही . वनविभागाच्या नियमामुळे अडचणी निर्माण होत होत्या मात्र यावेळी वनविभागाच्या परवानगीसह 30 कोटी रुपयांच्या पेक्षा अधिकचे रस्ते मंजूर करून घेतले असून त्या रस्त्यांनाही लवकरच सुरुवात होणार आहे .

शहरातील रस्त्यासाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले असून शहरात होणारा रस्ता हा मुंबई पुण्याच्या धर्तीवर मॉर्निंग वॉकचे स्वतंत्र रस्ते दोन्ही साईडने बैराकेटिंग सह प्रायोजित राहणार असून रस्त्यावरच मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांना व्यायाम करण्याची साधने उपलब्ध राहणार आहेत . अत्याधुनिक असे शौचालय ही रस्त्यावर निर्माण करण्यात येणार आहे . विकासामध्ये हा रस्त्याचा मोठा वाटा असतो त्या दृष्टीने जास्तीत जास्त रस्ते आणण्याचा प्रयत्न मागील दोन वर्षात करण्यात आला असून यामध्ये शेतकऱ्यांंंच्या दृष्टीने पाणंद रस्त्याची निर्मिती ही होत आहे .

अनेक वर्षापासुन शेतकऱ्यांची मागणी असलेला नांदला पानंद रस्तेसाठी नेमकेच दहा कोटी रुपयांची मंजुरात झाली असून त्या रस्त्याचे कामही सुरू झाले आहे . यासोबतच पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत ,प्रशासकीय इमारत , रेस्ट हाऊस इमारत यांची सुद्धा काम सुरू झाले आहे यासोबतच विदर्भ – मराठवाड्याला जोडणाऱ्या ब्रिज कम बंधाऱ्याची निर्मिती ही जवळपास सव्वाशे कोटी रुपये मंजूर झाले असून त्यांची काम सुरू झाले असल्याची माहिती यावेळी दिली . देवसरी येथे ६० कोटी रुपयांचा , तिवरंग येथे ३०कोटी रुपयांचा तर चातारी येथे २० कोटी रुपयांचा ब्रिज कम बंधारा होत आहे .त्यासोबतच देवसरी गावाचा पुनर्वसनाचा प्रश्नही निघाली काढण्यात आला आहे

पुनर्वसनासाठी उमरखेड जवळील आयटीआय कॉलेज परिसरात जागा उपलब्ध झाली असून त्यासाठी शाळा , मंदिर ,अंगणवाडी , ग्रामपंचायत कार्यालय पुनर्वसन झालेल्या वस्तीमध्ये सिमेंटचे रस्ते नाल्या मैदान विकसित करण्याचे दृष्टीने महाराष्ट्र शासनाने पाच कोटी रुपये मंजूरही केले असल्याचे यावेळी सांगितले . उमरखेड नगर परिषदेमधील शाळा चे स्ट्रक्चरल ऑडिट करून शाळा नव्याने निर्माण करण्याचे काम सुरू आहे तर नगर परिषदेचे कार्यालय कार्पोरेटच्या धरतीवर विकसित करण्यासाठी चार कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .

विदर्भ मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी तारांगणाचा अभ्यास करण्यासाठी उमरखेड मध्ये भव्य असे तारांगण उभारले असून इतिहासात पहिल्यांदा पर्यटन खात्याकडून 25 कोटी पेक्षा जास्त निधी उमरखेड आणि महागाव मध्ये प्राप्त करत अनेक धार्मिक स्थान विकसित करण्यात येत आहे तसेच आदिवासी विकास अंतर्गत सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करण्यात आला असून राज्य शासनाच्या शक्तीपीठ हा महामार्ग पुसदून देण्याचा घाट होता परंतु तो महागाव व उमरखेड मधून जाणार असून यामुळे मोठ्या उद्योगांना चालना मिळून बेरोजगारांना काम मिळणार आहे .उद्योगासाठी लागणारे इन्स्पा स्ट्रक्चर तयार झाल्याने नवीन उद्योजक या भागात येण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले .

तालुक्यातील मुळावा येथे काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी आमदार असताना तेथील रस्ते अतिशय दयनी होते . महायुतीचे सरकार आल्यानंतर मुळावा ते शेंबाळपिंपरी व पळशी फाटा ते माळ असली कामास सुरुवात झाल्याचे सांगत नितीन भुतडा यांनी काँग्रेसच्या नेत्यांना टोला लगावला .

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
× How can I help you?