नांदेडराजकिय

आ. माधवराव पाटील जवळगावकर भाजपात आल्यास बाबुराव कदमांच्या अडचणीत होणार वाढ

नांदेड, दत्ता शिराणे। आ. माधवराव पाटील जवळगावकर हे भाजपात आल्यान बाबुराव कदम यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चर्चा हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघात होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आमदार होण्याची स्वप्न ,,, स्वप्नच राहते की काय.. अशी चर्चा होऊ लागली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक्ताव चव्हाण भाजपात गेल्यानंतर हदगाव हिमायतनगर विधानसभेचे विद्यमान आ माधवराव पाटील भाजपात जाणार आहेत, आशा चर्चा रंगत आहेत. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी सध्या मी काँग्रेस सोबतच आहे, असे सागीतले असून, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे म्हंटले आहे. परंतु राजकारणात केव्हाही कधीही काहीही होवू शकते, त्यामुळे आ. जवळगावकरही काही दिवसांच्या अंतराने भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा या दोन्ही तालुक्यात रंगू लागली आहे. तसे झाल्यास शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्या अडचणीत वाढ होणार, असे मानले जात आहे.

नांदेड जिल्हयात काँग्रेस आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे समीकरण राहत आले आहे. परंतू राज्यात अशा काही राजकीय घडामोडी पडल्या की, नांदेड जिल्ह्यातील काँग्रेची कमान सांभाळणारे अशोकराव चव्हाणच कॉंग्रेसला रामराम करून भाजपमध्ये गेले. त्यांच्या जाण्याचे अनेकजण वेगवेगळे तर्क, वितर्क वर्तवित आहेत. परंतू एक बाब महत्वपूर्ण उरते की, कॉंग्रेस बॅकफूटवर आली आहे. हदगाव-हिमायतनगरचे काँग्रेसचे विद्यमान आ. मापवराव पाटील जवळगावकर हे माजी मुख्यमंत्री चव्हाणांचे अतिशय जवळचेच मानले जातात. आता अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्याने आ. जवळगावकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

विशेषत्वाने आ. जवळगावकर ज्या मतदार संघाचे नेतृत्व करतात, त्या दोन्ही हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात मात्र वेगाने चर्चा होत असून, आता आमदार जवळगावकर यांची भूमिका काय? याची उत्सुकता मोठ्याप्रमाणात तानली जात आहे. आ. माधवराव पाटील जवळगावकर हे मी सध्याला काँग्रेसमध्येच असल्याचे सांगत आहेत. परंतू विधानसभा निवडणुकीला आणखीन अवधी शिल्लक असल्याने पुढची रणनिती काय असेल? हे अधीकचे आताच सांगणे कठीण आहे.

विशेष करून महत्वपूर्ण बाब एक अशी ठरते की, हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदार संघात आ. जवळगावकर व गेल्या निवडणुकीत अपक्ष असूनही नंबर दोनची मते घेतलेले शिवसेनेचे बंडखोर उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यातच सरळ सरळ लढत होईल, असे राजकीय वर्तुळात आतापासूनच चर्चा रंगत आहे. परंतु शिवसेना शिंदे गट व भाजपा महायुतीत आगामी लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुकीलाही सामोरे गेली तर भाजप आणि शिवसेनेला जागा वाटपात तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसे झाल्यास भाजपमध्ये येवून आ. जवळगावकर भाजपचे उमेदवार राहतील आणि दुसरी बाजू अशी की, भाजपकडून शिवसेनेने जागा सोडून घेतल्यास बाबुराव कदम कोहळीकर उमेदवार राहतील? मग जवळगावकरांचे कसे? याची चर्चा सध्या हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात जोरदारपणे होवू लागली आहे.

लोकसभेच्या निवडणूका ह्या एप्रिलमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधान सभेच्या निवडणूका पार पडणार आहेत, त्यामुळे सत्तेची समीकरणे जुळविण्यात कोण यशस्वी ठरतो हे पाहण्यासाठी आणखीन तीन महिने वाट पहावी लागणार आहे, एवढे मात्र निश्चित.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!