नवीन नांदेड। परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती स्वामी यांच्यावर समाज कटकांनी शाई फेकल्याबद्दल नांदेड परिवहन कार्यालयीन कर्मचारी यांच्या वतीने लेखणी बंद करून निषेध व्यक्त करण्यात आला.
13 आक्टोबर रोजी दुपारी 1 ते 2 वाजता परभणी येथील उप प्रादेशिक कार्यालयात ऊप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती आश्विनी स्वामी यांच्यावर संमाज कंटाकव्दारे शाईफेक झाली असून हि बाब अतिशय गंभीर व निदंनीय असून संबधित समांज कटंकावर तात्काळ अटक करुन कठोर कार्यवाही करण्याच्या मागणीसह व श्रीमती अश्विनी स्वामी यांच्या समर्थनार्थ आज दि.13 आक्टोबर रोजी दुपारच्या मध्यातंर नंतर नांदेड परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व मोटार वाहन संघटनेच्या पदाधिकारी यांनी लेखणी बंद आदोलंन करुन कर्मचारी यांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन देण्यात आले, यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती होती.