प्रा.डॉ. दिलीप काठोडे यांना समाजकार्य विषयात संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता

नांदेड l श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र नवीन नांदेड येथील सहाय्यक प्राध्यापक तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दिलीप काठोडे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्याकडून समाजकार्य या विषयात पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ नानासाहेब जाधव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू. आर. मुजावर यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच महाविद्यालयातील संशोधन केंद्राची संचालक डॉ. एन.जी. पाटील, डॉ. मनीषा मांजरमकर, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. निरंजनकौर सरदार, डॉ. मेघराज कपूर डेरिया, डॉ. विद्याधर रेड्डी, डॉ. प्रतिभा लोखंडे, डॉ. शेख ए.ए., डॉ. अंबादास कर्डिले, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. सुतशीला वरघंटे, प्रा. सुनील गोईनवाड, प्रा. गोपाल बडगिरे, ग्रंथपाल सुनील राठोड, संतोष मोरे, राजेश पाळेकर, सुनील कावळे, नरेंद्र राठोड आदींनी डॉ. दिलीप काठोडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
