क्राईमनांदेड

पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हदीत 12 घर फोडी करणा-या सराईत आरोपीस अटक

नांदेड। नांदेड शहरात दिवसेदिवस घरफोडी व चोरीचे घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयावर प्रतिबंध व गुन्हे उघड करणेबाबत नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी वेळोवेळी नांदेड शहरातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. या आदेशानुसार भाग्यनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांनी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकास मार्गदर्शन करुन घरफोडी व चोरीचे गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले. त्यावरून आज येथील पोलिसांनी एका सराईत चोरट्यास अटक केली असून, त्या आरोपी कडुन 35 तोळे सोने, 500 ग्रॅम चांदी व इतर साहीत्य असा एकुण 25 लक्ष 65 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कार्यवाहीचे सर्वस्तरातून स्वागत केले जात आहे.

दिनांक 26.11.2023 रोजी पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हदीतील फरांदेनगर येथील श्री रविंद्र जोशी महाराज यांचे घरी घर फोडी होवुन सोन्या चांदीचे दागिणे व इतर साहीत्य चोरीस गेल्याने पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथे गु.र.नं.452/2023 कलम 454,457,380 भा.दं.वि.प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. पोलीस स्टेशन भाग्यनगर पोलीस निरीक्षक श्री सुर्यमोहन बोलमवाड यांनी सदर घटने बाबत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सदर घटनास्थळ व परिसरातील सि.सी. टिव्ही कॅमेरे चेक करुन आरोपीचा शोध घेणे कामी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अमंलदार यांनी गुन्हा घडल्यापासुन सतत 15 ते 20 दिवस फरांदेनगर, मौरचौक, छत्रपतीचौक, बजाजनगर, एकतानगर व नांदेड शहरातील विविध ठिकाणचे 200 ते 250 सि.सी.टिव्ही फुटेज चेक करुन सदर घर फोडी मधील आरोपीचे फुटेज हस्तगत करुन आरोपीची ओळख पटवली.

दिनांक 23.12.2023 रोजी पोलीस स्टेशन भाग्यनगर गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार असे पोलीस स्टेशन हदीत घरफोडीचे गुन्हयातील व इतर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे कामी व पेट्रोलींग करीत असतांना एक इसम हा जिरायत मैदान परिसरामध्ये संशयीत रित्या फिरत असतांना दिसुन आला. तो पोलीसांना पाहुन पळुन जात असतांना गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी सदर इसमांचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले असता त्याचे बारकाईने निरीक्षण करता सि.सी. टिव्ही फुटेज मधील इसम व ताब्यातील इसम हे एकच असल्याची खात्री झाल्याने गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमंलदार याना त्यांचे ताब्यात एक लोखंडी रॉड, पक्कड व हातोडी असे घर फोडी करण्याचे साहीत्य मिळुन आले.

सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अभिजीत ऊर्फ अभय पिता देवराव राऊत वय 25 वर्षे व्यवसाय मजुरी रा. बेलानगर, भावसारचौक, नांदेड असे सांगितले. त्याचे कडील साहीत्या बाबत विचारल्याने त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यास पोलीस स्टेशनला आणुन सखोल चौकशी केली असता त्याने पोलीस स्टेशन भाग्यनगर हदीत विविध ठिकाणी वेगवेगळया वेळी घरफोड्या केल्याचे कबुल केले.

आरोपी अभिजीत ऊर्फे अभय पिता देवराव राऊत याने पोलीस स्टेशन भाग्यनगर अभिलेखावर नोंद असलेला गु.र.नं. 452/2023 कलम 454,457,380 भा.दं.वि. व इतर 11 अशा एकुण 12 घर फोडीच्या गुन्हयाची कबुली दिली आहे. त्याचे कडुन वरील 12 घर फोडी पोलीस स्टेशन भाग्यनगर अभिलेखावरील घरफोडीच्या गुन्हयातील 35 तोळे सोने, 500 ग्रॅम चांदी,लॅपटॉप, टिव्ही, मोबईल, टॅब, कॅमेरा असा 25,65,000/-रुचा मुद्देमाल जप्त करुन चांगली कामगिरी केली.

सदरची कामगिरी मा.श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार साहेब, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा.श्री सुरज गुरव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, नांदेड शहर, नांदेड, पोलीस निरीक्षक श्री सुर्यमोहन बोलमवाड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी पो.उप.नि. सुनिल भिसे व पोलीस अमंलदार पोहेकॉ/709 दिलीप राठोड, पोहेकॉ/1098 गजानन किडे, पोहेकॉ/818 प्रदिप गर्दनमारे, पोकॉ/710 ओमप्रकाश कवडे व पोकॉ/516 हनवता कदम पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड व सायबर सेल येथील पोहेकॉ/1242 राजेंद्र सिटीकर यांनी पार पाडली आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!