हिमायतनगर,अनिल मादसवार। हिमायतनगर येथील विद्युत महावितरण कंपनी कार्यालयाकडून विजेचा पुरवठा सुरळीतपणे मिळत नसल्याने जनतेच्या समस्येत मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपासून तर कमी अधिक दाबाचा विज पुरवठा होत असल्याने आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होऊ लागल्याने कांच्या घरची विद्युत उपकरणे जळून जात आहेत. तर सातत्याने कमी  दाबाचा विज पुरवठा होत असल्याने कुपनलीका चालत  नाहीत.  परिणामी पाणीटंचाई च्या झळा अधिक तिव्र स्वरूपात जाणवत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर विद्युत महावितरण कंपनी कार्यालयात कार्यरत असलेले उप कार्यकारी अभियंता व सहायक अभियंता हे कार्यालयाला कधी एखाद्या वेळी हजर राहून बहुतांश वेळा अनुपस्थित राहतात. कार्यालयांतील प्रमुख उपस्थितीत राहत नसल्याने त्यांचाच कित्ता त्यान्च्या अधिपत्याखाली काम करणारी यंत्रना गिरवीत आहेत.  या ठिकाणी मोठ्याप्रमाणात विजेची वसूली होते.  विज ग्राहक विज बिलाचा भरणा वेळेत करतात,  मात्र त्यांना वेळेवर, आणी, पाहीजे त्या प्रमाणात विज उपलब्ध होत नाही. ही विज ग्राहकांची हेळसांड नव्हे काय? असा संतप्त सवाल शहरवाशीय नागरीक व्यक्त करीत आहेत.

सद्यस्थितीत उन्हाची दाहकता प्रचंड प्रमाणात वाढली असताना  शहरात विजेचा लपंडाव सुरूच आहे. विशेषकरून कमी दाबाचा विज पुरवठा ही रोजचीच बोंब झाली आहे. शहरात  विजेवर चालणारी उपकरणं बंद पडत आहेत. हा ग्राहकांना मोठा अर्थिक भुर्दंड बसत आहे. काही ठिकाणी  निर्वाणीचा पाणी साठा उपलब्ध असल्याने कुपनलीका कश्यातरी हेलकावे देत पाणी देत आहेत.  परंतू महावितरण कंपनीच्या या प्रतापामुळे सर्वसाधारण नागरिकांना पाणी मिळणे अवघड होऊन बसले आहे.  एकंदरच विज वितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजनाचा फटका विज  ग्राहकांना बसत आहे. 

एकीकडे विजदेयके वसुलीसाठी महावितरण अधिकारी ग्राहकांना वेठीस धरतात मात्र सुरळीत वीज पुरवठा देण्यात कुचराई का..?करतात असा सवाल उपस्थित केला जातो आहे. या बाबींकडे संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता भोकर, अधिक्षक अभियंता नांदेड यांनी वेळीच लक्ष पुरवून हिमायतनगर या ठिकाणची महावितरण कंपनीची विस्कटलेली घडी निट करून विज पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा वीज कंपनी व महावितरण अधिकारी यांच्या विरोधात बंड पुकारून मोर्चा काढावा लागेल अश्या संतापजनक प्रतिक्रिया नागरिक बोलून दाखवीत आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version