सेवा निवृत्त व ज्येष्ठ नागरिकां साठी विना मूल्य (फ्री-मुफत) अर्थात निःशुल्क भव्य शिबीराचे आयोजन – डाॅ.हंसराज वैद्य
नांदेड| सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ,ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबाद,नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती आणि गुफीक हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने पाच आॅक्टोबर (5/11/2023) रोजी रविवारी दमा,जुनाट खोकला (आलर्जी), मुतखडा,सांधे दूखी(संधी वात), मान,पाठ , कंबर, गुडघे,घोटे, हाडे दुखी तसेच हाडे ठिसूळ होणें,रक्तात युरियाचे प्रमाण वाढणें इ.च्या विना मूल्य अर्थात निःशुल्क(फ्री) तपासण्या व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर वैद्य रूग्णालय परिसर , जिल्हा पोलिस मुख्यालया (एस. पी. आॅफीस) समोर वजिराबाद नांदेड येथे रविवारी सकाळी 11ते दूपारी 2 वाजे पर्यंत चालेल. ज्यांच्यावर पूर्व तपासण्या झालेल्या असून उपचार चालू आहेत अशा रूग्णांनीं रिपोर्टस् व कागद पत्र सोबत आणने आवश्यक आहे.तसेच ज्यांनां मूत खडा आहे अशांनीं सोनोग्राफी नव्याने स्वखर्चानी करून घेणे व आणणें अवश्यक आहे.हे शिबीर सर्वच सेवा निवृत्त व सर्वच शहरी तथा ग्रामिण (खेड्यातील) ज्येष्ठ महिलां पुरूषां साठी आहे.गरजूनी या संंधीचा फायदा घ्यावा असे आवाहान डाॅ.हंसराज वैद्य यांनी केले आहे.