अर्धापूर| राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कंत्राटी भरती मागील सरकारची असल्याची बनवाबनवी करीत आहेत.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बदनामी थांबवा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करतांना राज्य सरकारला दि.२२ रविवारी रोजी इशारा दिला आहे.
राज्य सरकार आर्थिक दृष्ट्या अडचणीत असल्यामुळे तसेच सर्व क्षेत्रात अपयशी ठरल्यामुळे नोकर भरतीचे कंत्राट काढून मनमानी पध्दतीने ट्रे़डर काढून मंत्री,आमदार यांना भ्रष्टाचार करण्यासाठी कंत्राटी नोकर रद्द करण्याची नामूश्की सरकार वर आल्याने ते आपले खापर दुसऱ्या वर फोडण्याचे उद्योग भाजपने आंदोलन करून केविलवाणा प्रयत्न थांबवावा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बदनामी शिवसेना कदापिही खपवून घेणार नसून जसासतसे उत्तर देण्यासाठी जिल्हाभरात शिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करीत गाढव आंदोलनात आणून राज्य सरकार विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करीत जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष कल्याणकर,शहरप्रमुख काजी सल्लावोद्दीन,उपसभापती अशोक कपाटे,बालाजी कल्याणकर,शेतकरी सेनेचे रमेश पाटील क्षीरसागर,सरपंच सदाशिव इंगळे,युवासेना विधासभा प्रमुख भगवान पवार,चेतन कल्याणकर, नागोराव ढगे, दत्ता भरकड,पप्पू रजेगोरे,अशोक डांगे,गजानन गव्हाणे,सुनील बोबडे,चेतन कल्याणकर,दीपक कदम,प्रकाश मोहिते, शेख अली,संदीप कल्याणकर,होनाजी जोगदंड,राजू पाटील,सोशल मिडियाचे रफीक शेख यांच्यासह अनेक शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते.