नवीन नांदेड। विजया दशमी दसरा निमित्ताने भाजपा महानगर उपाध्यक्ष, तथा सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख यांच्या वतीने आयोजित ५१ फुटाचा रावणाचे दहन लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित २४ आक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता वाघाळा पाटीजवळ असलेल्या खुले मैदान हडको भागात होणार आहे.
भाजपा महानगर उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख यांच्या वतीने गेल्या २००५ पासून विजया दशमी दसरा निमित्ताने रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो या वर्षी विजया दशमी दसरा निमित्ताने २४ आक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता फटाक्यांचा व ढोलताशांच्या गजरात ५१ फुटाचा रावणाचे दहन भाजपाचे नांदेड जिल्हयाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते तर नांदेड शहर भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी महानगर अध्यक्ष प्रविण साले, चैतन्य बापू देशमुख, अभिषेक सौदे, बाळु खोमणे,जनार्दन ठाकूर यांच्या सह लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत होणार आहे.
गेल्या पाच दिवसापासून हिंगोली येथील रवि यांच्या मार्गदर्शनाखाली ९ कलाकाराच्या साह्याने ५१ फुटाचा रावण तयार करण्याचा जागी महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुरते यांनी २२ आक्टोबर रोजी पाहणी करून दहन जागा पाहणी करून सुचना दिल्या आहेत. या रावण दहन कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक वैजनाथ देशमुख यांनी केले आहे.