नवीन नांदेड। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सिडको इंडिया 41 साईबाबा नगर बिडी कामगार कॉलनी येथील श्री.शिवराज्य दुर्गा महोत्सव समिती येथिल मैदानात काँग्रेस पक्षाचे युवा नेते संतोष कांचनगिरे यांच्या वतीने भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे हे होते तर या रांगोळी स्पर्धेचे मुख्य परीक्षक म्हणून इंदिरा गांधी हायस्कूल येथील पर्यवेक्षिका ललिता कोल्हेवाड ,डॉ . ललिता शिंदे बोकारे,भि.ना. गायकवाड, किशनराव रावणगावकर, शंकरराव धिरडीकर, प्रसिद्ध चित्रकार श्रीरंग खांजोडे, किशनराव रावणगावकर, नामदेव पदमने, यांनी काम केले. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक युवा नेते संतोष कांचनगिरे यांनी केले.
या रांगोळी स्पर्धेत (प्रथम ) गजश्री मारावर,(द्वितीय) सुमित्रा दीक्षित, (तृतीय)सीमा लंगडे, व उत्तेजनार्थ अनेक सहभागी स्पर्धकांना पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. शशिकांत हटकर यांनी केले. यावेळी सर्व दुर्गा महोत्सव समितीच्या महिला मंडळासह वॉर्डातील असंख्य महिला भगिनींची उपस्थिती होती.