नांदेडमहाराष्ट्र
आ. माधवराव पा. जवळगावकर आणि गावकऱ्यांच्या एकजुटीमुळ जवळगावला नावलौकिक मिळाला
नांदेड। आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे दमदार नेतृत्व आणि गावकऱ्यांच्या एकजुटीने केलेल्या कामामुळेच जवळगावला नावलौकिक मिळाला आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे आवर सचिव तथा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समितीचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी केले.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन 2020-21 व 2021-22 या दोन वर्षाच्या कालावधीत घेण्यात आलेल्या स्पर्धेत राज्यस्तरावरून पात्र ठरलेल्या गावातील विकास कामांची तपासणी करिता राज्यस्तरीय तपासणीने जवळगावची आज भेट देवून पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, उपसचिव बाळासाहेब हजारे सहाय्यक, सहाय्यक कक्ष अधिकारी रमेश पात्रे, नांदेड जिल्हा परिषदच्या जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुदेश मांजरमकर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, समाजशास्त्रज्ञ महेंद्र वाठोरे, विस्तार अधिकारी एस. आर. शिंदे, पी. आर. टारपे, धारोजी हंबर्डे आदींची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसह तुळसबागा लावल्याने, गावात ऑक्सिजनचे प्रमाण वाढले असून यामुळे ग्रामस्थांना दीर्घायुष्य मिळणार आहे. गाव विकासाच्या विविध स्पर्धा होत असतात परंतु स्पर्धेपुरते काम न करता गावात केलेली कामे भविष्यकाळात ही शाश्वत टिकून ठेवणे महत्त्वाचे असल्याचेही मोरे म्हणाले. प्रारंभी टाळ मृदुंगासह रॅली काढून व जवरला येथील ढेमसा नृत्यने समितीचे स्वागत केले. त्यानंतर ग्राम पंचायतच्या वतीने गणेश मुर्ती, शाल व बुके देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर बोलताना म्हणाले, गावकऱ्यांच्या पुढाकाराने माझ्या गावात बदल झाला म्हणूनच आज आमचे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आले आहे. यापुढेही विविध स्पर्धेत गाव टिकून ठेवण्यासाठी आम्ही एकजुटीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद व्यवहारे यांनी केले. यावेळी गाव स्तरावर स्पर्धेच्या अनुषंगाने गावफेरी करून तपासणी करण्यात आली. गावकऱ्यांकडून स्वच्छते विषयी माहिती जाणून घेतली.
धोबीघाट, सात हजार वृक्ष लागवड, तुळसबाग, बोलकी शाळा, ओपन जिम, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी नाविन्यपूर्ण उपक्रम जवळगावने राबवले आहेत. ही सर्व कामे पाहून त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. यावेळी सरपंच सौ प्रतीक्षा नितेश पवार, उपसरपंच सुभाष माने, प्रमोद गौर, सतीश वराडे, ग्राम विकास अधिकारी शलेंद्र वडजकर, ग्राप सदस्य पांडुरंग पवार, गुरुदेव सेवा मंडळ, जगदंबा मंदिर कमिटी, शिवगर्जना नवयुवक सतीश हिरप अभियंता, गजानन पतंगे, सहायक अभियंता विशाल पवार,
ग्रामसेवक संघटनेचे सचिव आनंद कदम, मारोती मुधोळकर, अर्जुन जाधव, देशमुख, अंबलवड, आर. पी. चव्हाण, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, प्रतिष्ठित व्यक्ती, महिला, शालेय विद्यार्थी, शिक्षक, एएनएम, अंगणवाडी कार्यकर्ती, व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.