माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिडको परिसरात विविध कार्यक्रम आयोजन

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
1 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नवीन नांदेड l खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी साडेसहा वाजता श्री बालाजी मंदिर देवस्थान आनंद सागर सोसायटी हडको येथे अभिषेकाचे आयोजन व अभिषेकानंतर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे विश्वासू जिवलग मित्र श्री बाळासाहेब मोरे काका यांच्या कुटुंब यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येईल तसेच श्री बालाजी मंदिर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने प्रताप पाटील चिखलीकर यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे, तर भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्या वतीने भगवान बालाजी मंदिर हडको परिसरात वृतपत्र विक्रेता, साफसफाई महिला व पुरुष कामगार व गरजु लोकांना छत्री वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे.

बाळासाहेब मोरे त्यांच्या कुटुंबाच्या वतीने येणाऱ्या सर्वांना पुरण पोळीचे जेवण ठेवण्यात आलेले आहे, वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बाळासाहेब मोरे काका व बालाजी मंदिर विश्वस्त मंडळ आनंद सागर सोसायटी हडको नवीन नांदेड यांनी केले आहे.

भाजपा नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ भाऊ देशमुख यांच्या वतीने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वृतपत्र विक्रेता, सफाई महिला कामगार, व गरजु लोकांना छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मा. खासदार प्रतापराव पाटील व मान्यवरांच्या उपस्थित वाटप करण्यात येणार आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!