
नवीन नांदेड। दर्पण दिनानिमित्त सिडको परिसरातील ड्रिम फिटनेस क्लबचा वतीने पत्रकार बांधवाच्या सत्कार करण्यात आला यावेळी कलब मधील वजन कमी केलेल्याचा सत्कार करण्यात आला, यावेळी उपस्थित बिलोली तहसीलदार श्रीकांत निळे,बालाजी पाटील पुणेगावकर यांच्या सह सहभागी सदस्य उपस्थित होते.
दर्पण दिनानिमित्त ९ जानेवारी रोजी सिडको येथील ड्रिम फिटनेस कल्ब येथे आयोजित पत्रकार बांधवाच्या सत्कार सोहळयात किरण देशमुख,रमेश ठाकूर,संग्राम मोरे, तिरूपती पाटील घोगरे ,दिंगाबर शिंदे यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी फिटनेस कल्ब मधील सहभागी सदस्य असलेल्या बालाजी पाटील पुयड पुणेगावकर, यांनी जवळपास २४ किलो वजन कमी केले तर पुजा ठाकूर १४ किलो,साई पाटील यांनी १३ तर प्रमोद टेहरे, धम्मलपवार, विक्रम वाकडे, गजानन लोढे, डॉ.अमोल देवसरकर, तहसीलदार श्रीकांत निळे, मनोहर शिंदे,अतुल कछवा, मुंडे मॅडम, श्रुती यांच्या सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तहसीलदार श्रीकांत निळे यांनी यावेळी प्रत्येकांनी आरोग्य साठी व्यायाम आवश्यक असल्याचे सांगितले, तर बालाजी पाटील पुणेगावकर यांनी शरीर आहे तर आयुष्य आहे यासाठी दैनंदिन व्यायाम करणे आवश्यक असल्याचे सांगितले, तर ईतर सदस्यांनीही आपल्याला आरोग्य बाबत काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन तथा संयोजक पुजा अतुल ठाकूर यांनी सुत्रसंचालन केले.
