नवीन नांदेड। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने ईव्हीएम व्ही व्हीपॅट मशीन जनजागृती अंतर्गत वसरणी सज्जा कार्यालय यांच्या वतीने परिसरातील जिल्हा परिषद शाळा धनेगाव, ग्रामपंचायत धानेगाव व मुजामपेठ येथे ९ जानेवारी रोजी ग्रामस्थ उपस्थित प्रात्यक्षिक सादर करून दाखविण्यात आले.
महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजात राऊत यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अनिल धुळगंडे, तलाठी कैलास सुर्यवंशी ,कोतवाल अजून जानोळे ,निर्देशांक विवेकानंद मुधोळकर यांच्या उपस्थितीत महिला युवक, जेष्ठ नागरिक यांना प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले, या जनजागृतीअभियानाला धनेगाव, मुझामपेठ ,ग्रामपंचायत कार्यालय परिसरात प्रतिसाद मिळाला.
यावेळी संबंधितांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन बाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. ग्रामीण भागात जनजागृती अभियान अंतर्गत सादरीकरण करण्यात आले.