नांदेड/हिमायतनगर। अखिल महाराष्ट्र राज्य स्वत धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे, जिल्हा शाखा नांदेडच्या हिमायतनगर ” तालुकाध्यक्ष ” या पदावर प्रभाकर पळशीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त तालुका कार्यकारनी तयार करुन लवकरच जिल्हा कार्यकारीनीस अहवाल सादर करावा. महासंघाचे राज्याध्यक्ष व राज्यकार्यकारणी यांच्या नेतृत्वाखाली महासंघाच्या वाढीसाठी आपल्याकडून भरीव योगदानाची अपेक्षा आहे.
महासंघाची ध्येय व घोरणे आणि कार्यासाठी आपण निष्ठापूर्वक कार्यरत राहून कार्यकराल या अपेक्षेसह आपल्यावर ही जवाबदारी सोपविण्यात येत आहे. असे देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे, या निवडीचे पत्र रमेश गांजापुरकर जिल्हाध्यक्ष, नांदेड यांच्याहस्ते देण्यात आले आहे.