नवीन नांदेड| वसंतराव नाईक महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा- २०२४ उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
‘वसंतदर्पण’ भित्तीपत्रकाच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा-२०२४ या विषेशांकाचे प्रकाशन श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव,सौ.शांतादेवी जाधव आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.सौ.माधुरी देशपांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या भित्तीपत्रकाच्या माध्यमातून मराठी भाषेतील प्रसिद्ध कवींच्या कवितांचे संकलन विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांना मराठी भाषा,साहित्य आणि संस्कृतीचा परिचय व्हावा यासाठी ओनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदरील स्पर्धेत बी. कॉम. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी रोहित मुंजाजी दासरे (प्रथम),बी.कॉम.,द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी कु.वैष्णवी देविदास काळे (द्वितीय) तर बी.ए. द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी क्षितीजा आंबटवाड हिने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ.साहेबराव शिंदे, डॉ. लालबा खरात आणि डॉ.शोभा वाळुककर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि भित्तीपत्रक प्रकाशन कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.आर.डी.मोरे, उपप्राचार्य डॉ.व्ही.आर. राठोड, कार्यालयीन अधीक्षक आर.डी. राठोड, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. व्यंकटेश देशमुख, डॉ.नागेश कांबळे यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.