
उस्माननगर, माणिक भिसे| नांदेड जिल्ह्यांचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब उस्माननगर येथे भेटायला आले तेव्हा गावकऱ्यांनी विकास कामांसाठी निधीची मागणी केली, त्याअनुषंगाने मुलभूत सुविधा पुरविणे ( लेखाशिर्ष २५१५ -१३३८ ) या योजने अंतर्गत विकास कामे करण्यासाठी उस्माननगर येथील दत्त मंदिराकडे येणाऱ्या प्रवेशद्वार बांधकामासाठी दहा लक्ष रुपयचा निधी मंजूर झाल्याचे पत्र कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रविण पाटील चिखलीकर यांनी दत्त मंदिरातील मठाधिपती अवधुतबन महाराज यांना देण्यात आले.
यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुरेश मामा बास्टे , साईनाथ पाटील कपाळे , चेअरमण तथा भाजपाचे तालुकाचिटणिस संजय वारकड , बाबुराव पाटील घोरबांड , बालाजी कपाळे , व्यंकटराव पाटील , शिवाजी चक्रधर , माधव पाटील डोगरगावकर शिवशंकर काळे ( ग्रामपंचायत सदस्य) अमिन आदमनकर ( माजी सरपंच ) शेषेराव काळम पाटील ,नारायण घोरबांड , यांच्या सह अनेक जण उपस्थित होते. यावेळी भावी आमदार प्रवीण पाटील चिखलीकर यांनी विविध विषयांवर चर्चा करून जिल्ह्यातील विकास कामे झपाट्याने वाढत आहेत.उस्माननगर सर्कलशी चिखलीकर परिवाराची नाळ जुळलेली आहे. या भागाच्या विकासासाठी आवश्यक त्याठिकाणी कामे करू असे आश्वासन दिले.
