भगर खाल्याने अनेकांना विषबाधा; हदगाव येथे ७० रुग्णावर उपचार सुरू
हदगाव, शेख चांदपाशा। तालुक्यातील हरडफ. वाळकी. वाटेगाव कामारी हडसणी गुरफळी या गावातील नागरिकांनी आपल्या गावातील किराणा दुकानातून खुली भगर खाल्ल्याने भगरी मधून विषबांधा झाला असल्याने ६० ते७० नागरिकावर हदगाव शहराच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या मुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे .
सर्वांची प्रकृती स्थिर असून आत्तापर्यंत अनेक रुग्णांवर उपचार करून घराकडे पाठवले आहेत सध्या १५ ते २० जणांवर उपजिल्हा रुग्णालय मध्ये उपचार घेत असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप स्वामी यांनी सांगितले आहे दोनच दिवसावर महाशिवरात्र येऊन ठेपली असल्याने आज एकादशी निमित्ताने अनेकांना उपवास असल्याने गावातील किराणा दुकानांमधून भगर खरेदी करून खाल्ल्याने अस अनेक गावातील ७० व्यक्तींना विषबांधा झाल्याची माहिती आहे.
ही घटना वाऱ्या सारखीच पसरताच हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ पवार यांनी तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांना आदेशीत केले की भगरीमुळे अनेक लोकांना विषबाधा झाला आहे . विषबाधा जास्त संख्या वाढू नये म्हणून आपल्या गावातील सर्व किराणा दुकानदारांना भगर विकू देऊ नये व गावातील लोकांना विषबाधा होऊ नये म्हणून त्या संदर्भात जनजागृती करावी व सर्वांनी काळजी घ्यावी असे आदेश तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांना काढण्यात आले आहे हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जाधव व विनोद निकाळजे प्रतिष्ठान चे अध्यक्ष रमेश नरवाडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अशा घटना घडत असताना मात्र अन्न औषध व प्रशासन विभाग बेसावध असून मात्र जिल्हा प्रशासनाने याबाबतीत एक पत्र काढून नागरिकांना आवाहन केले आहे. विशेष म्हणजे अशा घटना घडल्यानंतरच प्रशासन जागृत होते हे दिसून आले हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.