
नवीन नांदेड। नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय यांनी थकीत मालमत्ता धारकांच्या निवासस्थान समोर ढोल ताशा वाजवुण ६ मार्च रोजी आठ लक्ष रूपये वसुली केली आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने थकीत मालमत्ता कर धारकांचा निवासस्थाना समोर ज्यांनी कर भरण्यासाठी असमर्थ दाखविलया नंतर त्याचा निवासस्थाना समोर ढोल ताशा वाजवुण जनमानसात प्रतिमा मलिन होईल या ऊदेशाने विशेष पथका मार्फत वसुली लिपीकासह ऊपोरकत प्रमाणे कार्य केले जात आहे त्यामुळे जनमानसात आपली बदनामी होऊ नये म्हणून मालमत्ता धारक काहीसा वेळ मागुन थकीत कराचा भरणा करीत आहेत.
६ मार्च २४ रोजी सिडको क्षेत्रीय कार्यालय याची रूपये ८ लाख१० हजार ८२२ रूपये पथका मार्फत एवढी वसुली करण्यात आली सदरील पथक मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांच्या नियंत्रणाखाली सहाय्यक आयुक्त संभाजीराव कास्टेवाड,कार्यालय अधिक्षक तथा पथक प्रमुख विलास गजभारे, पथक प्रमुख रंजित जोंधळे, मयुर पारीख, कर निरीक्षक प्रभु गिराम, लिपीक रविंद्र पवळे, सुधिर कांबळे, संतोष भदरगे, सुभाष पिंटरणे, राहुल वाघमारे,यांनी वसुली केली. थकीत मालमत्ता धारकांनी मालमत्ता भरून मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सिडको क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.
