
हदगाव, शेख चांदपाशा| माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभा खा,अशोक चव्हाण यांचे भाजप प्रवेशा नंतर हदगाव तालुक्यात स्थानीय काँग्रेसचा एकही मोठा नेता पदाधिकारी व कार्यकर्ता काँग्रेस मधून भाजप मध्ये गेलेल नाही. यामुळे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्या भाजप मध्ये प्रवेशाने हदगाव तालुक्यात “नो रिस्पॉन्स ” सध्यातरी मिळत आहे.
त्यांचे कट्टर समर्थक व हदगाव विधान सभा क्षेत्राचे काँग्रेसचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक हदगाव तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायती व सहकारी सोसाट्या त्यांच्या नेतृत्वात आहे. गेल्या दहा वर्षापासून पंचायत समिती व नगर परिषद काँग्रेसच्या माध्यमातुन त्यांच्या ताब्यात होत्या. सध्या तरी त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपात जायचे की..? नाही यासंबंधी “मौण” पाळल्याचे दिसून येत आहे.
हदगाव तालुक्यातील एक ही माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष किवा प,स ,जि,प,सदस्य त्यांच्या सोबत भाजपा मध्ये गेल्याचे दिसुन आलेल नाही हे आवर्जुन उल्लेख कराव लागेल हदगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला मरगळ असल्याच्या दिसून येत आहे. असे असले तरीही काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी आता पर्यत नातेगोत्याचे राजकारण करत असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता काँग्रेस पासून दूर असला तरी काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा आहे.
विशेष आहे म्हणजे हदगाव तालुक्यात माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण याचे चाहता वर्ग आहे. त्यांच्या जवळ हदगाव तालुक्यातील सर्व सामान्य कार्यकर्ता व पदाधिकारी यांना जवळ जाण्याचा योग आला नसला तरी त्यांना पण मानणारा वर्ग आहे. ही बाब वेगळी असली तरी ते काँग्रेसच्या सत्तेत असताना जेव्हा मंत्री असताना त्यांनी हदगाव तालुक्याला झुकते माप दिलेले आहे. त्यांनी त्यावेळी हे पाहिले नाही की कोणता आमदार विरोधी पक्षाचा आहे कोण सत्ताधारी आहे. त्यामुळे त्यांचे शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी देखील त्यांचे व्यक्तिगत संबंध चांगले असून, त्यांनी मागील झालेल्या नांदेड जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांना सहकार्य केलेला आहे.
हे आवर्जून उल्लेख करावा लागेल. तसेच शिवसेनेचे माजी खा.सुभाष वानखेडे यांचेशी व्यक्तिगत संबंध चागले आहे. पुढील भविष्य काळात त्यांना ह्या संबंधचा राजकीय दृष्ट्या किती फायदा होईल हे काळच ठरविणार आहे. त्यांच्या करिता अनुकूल परिस्थिती असतानाही त्यांच्या भाजप प्रवेशाने मात्र त्यांना ह्याच्याकडुन रिस्पॉन्स” मिळत नाही विशेष बाब म्हणव लागेल.
