नांदेड। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेचे शिवदूत , बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून मिष्ठान्न आणि फराळ पाठविण्यात आला आहे, शिवाय राज्य सरकारने गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती पुस्तिकाही जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या भेटवस्तूंचे १८ नोव्हेंबर रोजी वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे आणि सर्वसामान्य नागरिकांचे नेतृत्व म्हणून प्रसिद्धीस आलेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी राज्याचा कारभार चालवत असताना आपल्या पक्षाच्या संघटनात्मक बांधनित योगदान देणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडेही मोठे लक्ष दिले आहे,पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांच्या बळावर उभी राहिलेली शिवसेना अधिक नेटाने उभी राहिली पाहिजे,आगामी निवडणुकांमध्ये सक्षमपणे विजयी झाली पाहिजे,या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची पुनर्बांधणी सुरू आहे.शिवाय पक्षातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांनाही सामावून घेतले जात आहे.
राज्याच्या राजकारणाचा आणि विकासाचा गाडा यशस्वीपणे ओढत असताना दिवाळीमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांशी बूथ प्रमुखांशी आणि शिवदूतांशीही त्यांनी संपर्क ठेवला पाहिजे प्रत्येकांना दिवाळीनिमित्त फराळ आणि मिष्ठान पाठवले असुन .मुख्यमंत्री म्हणून गेले वर्षभरात केलेल्या विविध कामांची आणि शासकीय योजनांची माहिती असणारी माहिती पुस्तिकाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना पाठविली आहे.
या पुस्तिकेच्या आधारे आपल्या भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी बूथ प्रमुख आणि शिवदूत यांनी या पुस्तिकेचा उपयोग करून काम करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.प्रत्येक पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना,बूथ प्रमुख आणि शिवदूत यांना त्यांनी वैयक्तिक शुभेच्छापत्र पाठविले आहेत .
पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वैयक्तिक पत्र पाठवून त्यांना दिवाळीसाठी भेटवस्तू पाठवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री ठरले असावेत, मुख्यमंत्र्याच्या वतीने पाठविण्यात आलेल्या भेटवस्तूंचे वितरण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते आज करण्यात आले,यावेळी तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, तालुका प्रमुख अशोक मोरे,शहरप्रमुख तुलजेश यादव, शहरप्रमुख सुहास पाटील खराणे, महानगर संघटक शिवा बोंढारे, एम.ओ.टीमचे बालाजी गाडगे, अमोद साबळे,विजय यादव,सुरेश जाधव, माउली मोरे, पप्पु गायकवाड,अब्दुल रहेमान,गोंविंद कोकुलवार,बुथ प्रमुख शिवदूत व इतर पदाधिकारी उपस्थीतीत होते.