मल्हारी म्हाळसाकांत देवस्थान कहाळा यात्रेची तीनशे वर्षांपासून परंपरा कायम
नायगावं, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील मौजे कहाळा बुद्रुक येथील गावचं ग्रामदैवत असलेलं मल्हारी म्हाळसाकांत देवस्थानाची यात्रा भरण्याची परंपरा तीनशे वर्षांपासून आजही कायम असून या मठ संस्थानचे प्रमुख नीलकंठ महाराज कहाळेकर,धनंजय महाराज कहाळेकर,आणि गावचे माजी सरपंच तथा सक्रिय कार्यकर्ते सुनील पाटील लुंगारे यांनी ही प्रथा अखंडितपणे चालू ठेवली असल्याने ग्रामस्थासह सर्व भाविकांना या यात्रेचा आनंद वाटतो आहे.
नांदेड हायवे रस्त्यावरील नदीच्या तीरावर चोही बाजूनी हिरवीगार शेती, गुलाबी थंडीतील आणि निसर्गरम्य वातावरणात मौजे कहाळा नगरीतील मल्हारी माळसाकांत देवस्थानाची यात्रा फुलून निघाली होती, सात दिवस चालणाऱ्या या यात्रेत दररोज सदर देवस्थानाच्या वतीने महाप्रसाद कार्यक्रम, श्री खंडोबा रायाची तळी उचलणे, वारू कार्यक्रम, जंगी कुस्त्यांची दंगल आणि सायंकाळी महाराष्ट्राची परंपरा असलेली लावणी महोत्सव कार्यक्रम अशा भरगच्च विविध कार्यक्रमाने होत असलेली ही खंडोबारायाची यात्रा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आवर्जून भाविक येतात,अमर पद्दमवार , अशोक घोडके, राजेश गोपछडे,पवण गादेवार.जगदिश प्रतापवार . मनोज आर गुलवार. शाहीर बळीराम जाधव सुजलेगावकर यासह अनेक मान्यवरांनी या यात्रेच्या ठिकाणी उपस्थिती लावली होती.
आपल्या कुलदैवतांचे दर्शन घेऊन आणि हा यात्रेचा सोहळा पाहून तृप्त होतात ही प्रथा तीनशे वर्षांपासून आजही कायम आहे, भाविकांना काही कमतरता भासू नये म्हणून शेकडो हात राबले जातात. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी संतोष पाटील लुंगारे,योगेश माने, संतोष मोदलवाड, नरेंद्र सावकार येरावार, माधव अलसटवार, जयराम गाडे, संदीप मोदलवाड, रामदास मोदलवाड, दिगंबर चक्रधर ,मानेजी कोठेवाड, अवधूत वाघे, पांडुरंग चंचलवाड, बालाजी कहाळेकर, व्यंकटराव कहाळेकर ,संतोष बंडलवाड, दत्ता मोदलवाड, सटवा पोटेवाड, बालाजी अलसटवाड, गोविंद कासटवार, विठ्ठल मोरे, साईनाथ कहाळेकर यांनी यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले आहे.