
उस्माननगर, माणिक भिसे। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत , हिंदवी स्वराज्य संस्थापक , रयतेचे राजे श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उस्माननगर परिसरात विविध ठिकाणी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सम्राट अशोक प्राथमिक शाळा , समता मा. व उच्च माध्यमिक विद्यालय ,म.बसवेश्वर मा.विद्यालय , शारदा वाचनालय , आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृह , जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह , जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लाठ ( खु . ) प्राथमिक आरोग्य केंद्र उस्माननगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक आमिनशहा फकीर , गणेश लोखंडे , माणिक भिसे ,लक्ष्मण कांबळे , विठ्ठल ताटे पाटील , सुर्यकांत माली पाटील , नारायण पांचाळ ,बालाजी पु.घोरबांड , राजीव सोनटक्के ( स्वयंसेवक ) , विश्वंभर मोरे ( पोलिस पाटील ,) संजय भिसे ,करिम पठाण , सम्यक कांबळे , राहुल सोनसळे ( मुख्याध्यापक) राक्षसमारे , केसे , गादेकर ( मुख्याध्यापक लाठ खु.) , यांच्या सह शाळेतील शिक्षक , गावा गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य , चेअरमन , वसतीगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.
गावातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. उस्माननगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लोणे ,शेख , तसेच वैद्यकीय महिला कर्मचारी एन एम ,उपस्थित होते.परिसरात जागोजागी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
