हुशार व गुणवंत विद्यार्थी हे ग्रामीण भागात निर्माण होतात, कामाजी पवार

नवीन नांदेडl ग्रामीण भागात हुशार व कष्टाळु विधार्थी असल्याचे सांगून गुणवंत विद्यार्थी हे ग्रामीण भागातच निर्माण होत असतात असे प्रतिपादन कामाजी पवार यांनी ग्राम पंचायत कार्यालय टाकळगाव ता. लोहा यांच्या वतीने गुणवंत विधार्थी सत्कार सोहळा प्रसंगी केले.
ग्रामपंचायत कार्यालय टाकळगाव ता.लोहा यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दहावी, बारावी, परिक्षांमध्ये २०२४ मधील गावातील गुणवंत विधार्थी विधार्थीनी सत्कारचे आयोजन २४ जुन रोजी करण्यात आले होते,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव पाटील मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून कामाजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ तर प्रमुख म्हणून व्यंकटराव मोरे,पंढरी थेटे, ग्रामविकास अधिकारी अमृत शिंदे, गोविंदा लामदाडे, काशिनाथ लामदाडे.
चेअरमन शिवाजी मोरे, माजी सरपंच श्रीहरी पाटील लामदाडे, दिलीपराव मोरे,बडुरवार, घोरबांड, यांचा सह गावातील जेष्ठ व मान्यवर उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून टाकळगाव येथे गुणवंत विधार्थी सत्कार सोहळा आयोजन अशोकराव लामदाडे व सरपंच भिमराव लामदाडे यांच्या पुढाकाराने होत असल्याने दरवर्षी या सोहळ्या साठी शैक्षणिक क्षेत्रातील कुलगुरू,यांच्या व विशेष मान्यवर यांना बोलावून शैक्षणिक क्षेत्रातील विचार कार्यक्रम मधुन मांडल्या गेले अनेक वर्षांपासून गावाने ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध निवड प्रकिया पार पडल्या बदल विशेष अभिनंदन करून स्तुती कामाजी पवार यांनी भाषणातून केली.
सुत्रसंचालन शिक्षक आंनद भोंग यांनी केले व उपस्थित मान्यवरांच्ये स्वागत संरपच भिमराव लामदाडे, उपसरपंच संभाजी चिंतोरे,व गावातील ग्रामस्थ यांनी केले. यावेळी गुणवंत विधार्थी व विधार्थीनी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्प व पुस्तक देऊन गौरव केला.
या सोहळ्याला गावातील जेष्ठ व, प्रतिष्ठीत नागरीक, युवक, महिला,विधार्थी व विधार्थीनी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वृंद मोठया संख्येने उपस्थित होते.
