नांदेड| तीन राज्यातील भाजपच्या विजयाचा नांदेडमध्ये जल्लोष करण्यात आला. नांदेड भाजप महानगराच्या वतीने शहरातील महात्मा फुले चौक, हनुमान पेठ, मुथा चौक, आयटीआय चौकात फटाके फोडून ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजपच्या यशाबाबत X वर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी राज्यातील जनता आणि भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत.
या विजयानंतर नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील हनुमान पेठ मुथा चौक व आयटीआय चौक येथे फटाके फोडून, पेढे वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख मिलींद देशमुख, माजी अध्यक्ष प्रविण साले, प्रदेश सचिव देविदास राठोड, प्रदेश सदस्य व्यंकट मोकले, नंदु कुलकर्णी, भाजपा महानगर उपाध्यक्ष किशोर यादव, मोहनसिंह तौर, बालाजी शिंदे कासारखेडकर, सरचिटणीस शितल खांडील, विजय गंभीरे, साहेबराव गायकवाड, अमोल कदम, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष परमवीरसिंघ मल्होत्रा, केदार नांदेडकर, लक्ष्मीनारायण शर्मा, गिरीश ठक्कर, महादेवी मठपती, अपर्णा चितळे, माजी नगरसेविका श्रद्धा चव्हाण, दिपकसिंह ठाकूर, मारोती वाघ, आशिष नेरलकर, सचिन रावका, हरविंदरसिंघ मनन, धीरज स्वामी, रविसिंघ खालसा, बालाजी पा. शेळगावकर, स्वप्नील गुंडावार, बबलू यादव, व्यंकटेश जिंदम, क्षितिज जाधव व अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. निकालानंतर आता देशातील एकूण 28 राज्यांपैकी 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशात भाजपचे सरकार असेल. या 12 राज्यांमध्ये भाजप स्वबळावर सत्तेत राहणार आहे. काँग्रेस फक्त 3 राज्यात आहे. आघाडीच्या जोरावर एकूण 5 राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. ज्या राज्यांमध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करेल त्यात उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम ही राज्ये आघाडीवर आहेत. कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. याशिवाय बिहार आणि झारखंडच्या सत्ताधारी आघाडीत त्यांचा समावेश आहे.