
नांदेड। ग्रामीण पोलीसांनी एक गावठी पिस्टल व आकरा मोबाईलसह तीन आरोपीना पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण जि. नांदेड हद्दित अवैध गावठी पिस्टल बाळगणारे आरोपीतांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.
यातील आरोपींना अटक करण्यासाठी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, मा. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, मा. सुशीलकुमार नायक साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी योग्यत्या सुचना देवुन कार्यवाही करण्याबाबत आदेश दिला असता पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक एन.एस. आयलाने, याचे मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश अशोकराव कोरे, पोउपनि ज्ञानेश्वर मटवाड, प्रभाकर मलदोडे, संतोष जाधव, विक्रम वाकडे, शेख सत्तार मगदुम, मारोती पचलिंग, माधव माने, शिवानंद पंडीतराव तेजबंद, शंकर रेवन माळगे, मंगेश दिगांबर पालेपवाड, यांना दिनांक 31/03/2024 रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे वाजेगांव बायपास रोडवरील ब्रिजखाली वाजेगांव शिवार ता. जि. नांदेड येथे जावुन छापा मारला असता तेथे खालील इसम संशईतरित्या मिळुन आले. 1) आमेरखान महेफुजखान वय 22 वर्ष व्यवसाय मजुरी रा. एक्बालनगर, गाडेगांवरोड, नांदेड, 2) आदेश गौतम कांबळे वय 20 वर्ष व्यवसाय मजुरी रा. रहिमपुर, दुधडेरी, नांदेड, 3) सय्यद फेरोज सय्यद मुजीब वय 23 वर्ष व्यवसाय मजुरी रा. मिल्लतनगर, गाडेगांवरोड, नांदेड यांना ताब्यात घेवुन त्यांची अ.क्र. किंमत अंगझडती घेतली असता त्याचेकडे खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आला.
आमेरखान महेफुजखान याचे ताब्यात कंबरेला खोवलेली एक स्टिल रंगाची लोखंडी गावठी पिस्टल ज्यास ट्रेगर व ट्रेगरगार्ड असुन, ज्याचे ग्रीपवर प्लास्टीकच्या ब्राऊन रंगाचा दोन्ही बाजुस पटया व पट्यावर मध्यभागी लाल रंगाचा स्टार कि.अ.30,000/- रु. व पॅन्टच्या खिशात एक Oppo कंपनीचा काळ्या रंगाचा अँड्राईड मोबाईल ज्याचा IMEI NO.861451053636497, 861451053636489 असा किमती 17,000/-रु. 02 63,000/-
आदेश गौतम कांबळे याचे ताब्यात पैन्टच्या खिशात खालील मोबाईल मिळुन आले. 1) एक रेडमी कंपनीचा निळसर रंगाचा अँड्राईड मोबाईल ज्याचा IMEI NO.867707058779473 असा कि. अं. 10,000/- रु., 2) एक Oppo कंपनीचा काळ्या रंगाचा अँड्राईड मोबाईल ज्याचा IMEI NO.861451058004139, 861451058004121 असा कि. अं. 17,000/- रु. 3) एक Oppo कंपनीचा पांढऱ्या रंगाचा अँड्राईड मोबाईल कि. अं. 15,000/- रु. 4) एक सैमसंग कंपनीचा निळ्या आकाशी रंगाचा अँड्राईड मोबाईल कि. अं. 10,000/- 5) एक रेडमी कंपनीचा पांढऱ्या रंगाचा अँड्राईड मोबाईल कि. अं. 11,000/- रु.58,000/-
सय्यद फेरोज सय्यद मुजीब याचे ताब्यात पैन्टच्या खिशात खालील मोबाईल मिळून आले. 1) एक रियलमी कंपनीचा निळ्या रंगाचा अँड्राईड मोबाईल कि.अं.8,000/-रु. 2) एक सैमसंग कंपनीचा नेव्ही ब्लु रंगाचा अँड्राईड मोबाईल कि.अं.15,000/- रु. 3) एक सैमसंग कंपनीचा काळ्या रंगाचा अँड्राईड मोबाईल ज्याचा IMEI NO.352682106505885, 352683106505883 कि. अं.8,000/- रुपये. 4) एक VIVO कंपनीचा निळ्या आकाशी रंगाचा अँड्राईड मोबाईल कि. अं. 12,000/- 5) एक VIVO कंपनीचा निळ्या रंगाचा अँड्राईड मोबाईल कि. अं.15,000/- रु. एकुण 1,68,000/- असा मुद्देमाल मिळून आला आहे.
वरील मुद्देमाल मिळुन आल्याने सदर आरोपीतां विरुध्द पो.स्टे. नांदेड ग्रा. गु.र.नं.270/2024 कलम 3/25,7/25 शस्त्र अधिनियम, सह कलम 124,135 म.पो.का. प्रमाणे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनात स.पो.नि. सचिन गढ़वे पो.स्टे. नांदेड ग्रा. हे करीत आहेत.
जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत व केलेल्या कामगिरीबाबत पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील पथकातील टिमचे श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, मा.अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी अभिनंदन केले आहे.
