हिमायतनगर तालुक्यातील रामबाबू संस्थांनचे मठाधिपतींना आयोजित होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापन सोहळ्याचे निमंत्रण
हिमायतनगर,अनिल मादसवार। प. पू. राम बापू संस्थान वाळकेवाडी ता हिमायतनगर जि नांदेड येथील मठाधिपती हभप. श्री प्रकाश महाराज यांना आयोध्येमध्ये होणाऱ्या प्रभू श्री राम लल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले.
22 जानेवारी रोजी आयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम बालमूर्तीच्या स्थापन सोहळाचा ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. या प्राणप्रस्थापन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका अनेक मान्यवरांना दिल्या जात असून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे वाळकेवाडी येथील श्री राम बापू संस्थानचे मठाधिपती हरिभक्त परायण श्री प्रकाश महाराज यांना पाठविण्यात आले आहे हे निमंत्रण पत्रिका आज देण्यात आली आहे.
या प्रसंगी विश्व हिंदू परीषद प्रांत धर्मप्रसार सह प्रमूख तथा जिल्हाध्यक्ष श्याम रायेवार, विभाग विशेष व्यक्ती संपर्क प्रमुख तथा प्रांत सदस्य अनिरूध्द केंद्र, जिल्हा सेवा प्रमूख सूधाकर चिट्टेवार, शुभम गाजेवार, सोपान कोळगीर, न्यानेश्वर लिंगमपले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभू श्रीराम मूर्ती स्थापना कार्यक्रमाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व हिंदू बांधव आतुर झाले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे.
15-22 जानेवारी 2024 दरम्यान राम मंदिरातील वेळापत्रक पुढील प्रमाणे असणार आहे, 15 जानेवरी 2024 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी खरमास संपताचं. गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती म्हणजेच श्री रामाच्या बालस्वरूपाची मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. 16 जानेवारी 2024 या दिवसापासून रामललाच्या मूर्तीच्या निवासासाठी विधीही सुरू होतील. 17 जानेवारी 2024 या दिवशी रामलल्लाची मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. 18 जानेवारी 2024 या दिवसापासून अभिषेक विधी सुरू होईल. मंडप प्रवेश पूजा, वास्तुपूजा, वरुण पूजा, विघ्नहर्ता गणेश पूजा आणि मर्तिक पूजा होतील.
19 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करण्यात येणार आहे. आग विशिष्ठ पद्धतीने पेटवली जाईल. 20 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे गर्भगृह 81 कलशांनी पवित्र केले जाईल, ज्यामध्ये विविध नद्यांचे पाणी जमा करण्यात आले आहे. वास्तुशांती विधी होईल. 21 जानेवारी 2024 या दिवशी, यज्ञविधीमध्ये, विशेष पूजा आणि हवन दरम्यान, रामलल्लाला 125 कलशांसह दिव्य स्नान घालण्यात येईल. दिनांक 22 जानेवारी 2024 या दिवशी मध्यकाळात मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाची महापूजा होणार आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी जवळपास पाच शतकांची प्रतीक्षा संपणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त काढण्यात आला आहे.