नांदेड। भाजपा महानगर नांदेड तर्फे धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर व कामगार आघाडीचे सुरेश लोट यांच्या वतीने नांदेड मधील क्रिकेट रसिकांसाठी विश्वचषकाचे सामने मोठ्या पडद्यावर दाखविण्यासाठी नांदेड शिवाजीनगर येथील उमरेकर हाईटस च्या हॉलमध्ये मोठ्या पडद्यावर भारत पाकिस्तान सामन्याचे उद्घाटन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले असून भारताने पाकिस्तानला चारीमुंड्यांची चित केल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी व फुलांची उधळण करत, तिरंगे ध्वज फडकावत ढोल ताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा केला.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण साले हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. वैद्यकीय आघाडीचे डॉ. सचिन उमरेकर, साहेबराव गायकवाड,जिल्हा प्रवक्ता धीरज स्वामी, संतोष परळीकर, मनोज जाधव अक्षय अमीलकंठवार,शैलेश कऱ्हाळे,अनिल गाजूला, क्षितिज जाधव,विजय गंभीरे, महादेवी मठपती, कामाजी सरोदे,संदीप पावडे,अमोल ढगे, विपुल मोळके,प्रितमचंद चौधरी यांची उपस्थिती होती. सामन्या दरम्यान पाकिस्तानची तिसरी विकेट पडत नव्हती. योगायोगाने खा.चिखलीकर कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचताच पाकिस्तानची एक विकेट पडली.
पाकिस्तानचे सर्व खेळाडू १९१ वर आऊट झाल्यानंतर भारताने अवघ्या ३० षटकांमध्ये रोहित शर्माच्या ८३ व श्रेयस अय्यरच्या ६३ धावांच्या योगदानामुळे पाकिस्तानला परत एकदा विश्वचषकामध्ये पराजित केले. आजपर्यंत भारताने पाकिस्तानला विश्वचषकामध्ये सलग आठ वेळा पराजित केले. त्यामुळे मोठ्या पडद्यावर सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या शेकडो क्रीडाप्रेमींनी जल्लोष केला. भारतातर्फे मारण्यात आलेल्या प्रत्येक चौकार व षटकारांचे ढोल ताशा वाजवून स्वागत करण्यात येत होते. कार्यक्रमाचे संचलन शिवा लोट यांनी तर आभार ॲड.करण जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष भारती, प्रदीपसिंह हजारी,राजेश पावडे ,प्रभुदास वाडेकर, जनार्दन वाकोडीकर, शेख इम्रान, चक्रधर खानसोळे,शेख वाजीद,शेख बबलू, विशाल वाडेकर यांनी परिश्रम घेतले.गुरुवार दि.१९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता भारत बांगलादेश या सामन्याचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. चैतन्य बापू देशमुख हे भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरविंद भारतीया, प्रा. नंदू कुलकर्णी, प्रा. जनार्दन ठाकूर, मोहनसिंग तौर, रामराव केंद्रे, अभिषेक सौदे हे उपस्थित राहणार आहेत.संभाजी उमरेकर हाइट्स, शिवाजीनगर नांदेड येथे आसन व्यवस्था मर्यादित असल्यामुळे सुरुवातीला येणाऱ्यांना प्रथम प्रवेश दिला जाणार आहे.त्यामुळे क्रिडाप्रेमी नागरिकांनी व तरूणांनी वेळेवर येऊन मोठ्या पडद्यावर मोफत सामने पाहण्याच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲड.दिलीप ठाकूर व कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी केले आहे.