राजकिय

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई| लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : नागपूर- 53 पैकी 26, भंडारा-गोंदिया- 40 पैकी 22, गडचिरोली-चिमूर- 12 पैकी 12, चंद्रपूर- 35 पैकी 15 आणि रामटेक लोकसभा मतदार संघात 41 पैकी 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 30 मार्च 2024 ही असून या मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होईल.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!