ग्रामपंचायत शिपायाला जि.प.शाळेतील तीन दिवसांच्या कामाची आदेश तात्काळ रद्द करा
नांदेड। ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्रामविकास विभाग अंतर्गत ग्रामपंचायत कामधंद्यामध्ये येतो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शिपायांना वेतन श्रेणी लागू नाही, त्यांच्यावर गावातील ग्रामपंचायतची साफसफाई दिवाबत्ती गावातील अडीअडचणीत ग्रामसेवकासोबत राहणे, गावातील वसुली गावातील अनेक काम ग्रामपंचायत शिपायाला करावी लागतात. पण जिल्हा परिषद नांदेड ने दिनांक 27-10-2023 रोजी जि प शाळेला आठवड्यातून तीन दिवस शाळेची साफसफाई करण्याचे पत्र काढले.
या पत्राची दखल घेत महाराष्ट्र राज्य कार्यरत ग्राम पंचायत कर्मचारी संघटना 5692 च्या नांदेड जिल्हा कार्यकारिणीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मीनल करणवाल, आणि, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कापसे मॅडम यांची भेट घेतली. आणि जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने निवेदन देऊन संबंधित पत्र रद्द करा अशी मागणी लावून धरली.
आणि हे पत्र तात्काळ रद्द करा अशी मागणी केली जर पत्र रद्द झाले नाही तर महाराष्ट्र राज्य कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी संघटना नांदेड च्या वतीने तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असाही इशारा निवेदनाद्वारे दिला. यासोबतच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी भविष्य निर्माण निधीची रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी. या मागणी सह अनेक मागण्यांची निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मीनल करणवाल यांना देण्यात आले.