एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत आमदार राजभवनावर धडकले
मुंबई। मुंबई येथे राज्यपाल श्री. रमेश बैस यांची राजभवन येथे मराठा आमदारांसह भेट घेऊन मराठा आरक्षणाचा धगधगता प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, असा आग्रह यावेळी धरला. सकाळपासून आम्ही सर्वपक्षीय मराठा आमदार मंत्रालय येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषणासाठी बसलो होतो.
हे उपोषण पार पडल्यानंतर सर्व आमदारांसह राजभवन येथे जाऊन राज्यपालांसमोर समाजाची एकूण परिस्थिती सांगितली. कुठल्याही परिस्थितीत समाजाला आरक्षण मिळायला हवे..जरांगे पाटील यांची तब्येत उपोषणामुळ खालावत आहे, मराठा तरुण आत्महत्या करत आहेत.असे असताना आमच्या आमदारकीचा काय फायदा? असा सवाल यावेळी राज्यपाल महोदयांना केला!
यावेळी विधिमंडळातील सहकारी निलेश लंके, कैलास पाटील, यशवंत माने,मोहन हंबर्डे, डॉ. राहुल पाटील, माधवराव पाटील जवळगावकर, बाळासाहेब आजबे, बाबासाहेब पाटील व इतर सहकारी उपस्थित होते.