हिमायतनगर। हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे मंगरुळ येथे सात दिवसीय विशेष निवासी शिबिराचे आयोजन रविवार दि. 11 फेब्रुवारी ते शनिवार दि. 17 फेब्रुवारी 2024 यादरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचा पाचव्या दिवस गुरुवार दि. 15 फेब्रुवारी रोजी शिबिरामध्ये सकाळी दैनंदिन दिनचर्याच्या नंतर योगासने प्राणायामानंतर सकाळी 8:00 वाजता रॅली काढून पशुधन चिकित्सा शिबिराचे विषयी शेतकऱ्यांचे जनजागरण करून पशुधन तपासणी करण्यासाठी चे आवाहन विध्यार्थ्यांनी केले. आणि तद्नंतर शिबिरार्थ्यानी श्रमदान केले.
सकाळी 09 ते दुपारी 01 वाजेपर्यंत 90 हुन अधिक पशुधन तपासणी करण्यात आली. यासाठी हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. लोखंडे व सहाय्यक शिंदे यांनी पशुधन चिकित्सा शिबिर उत्साहात व यशस्वी रित्या पार पडले. या प्रसंगी डॉ. लोखंडे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या पशुधन चिकित्सा शिबिरासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे तथा सहकार्यक्रमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे यांनी उत्कृष्ट रित्या यशस्वी केले.
या शिबीराला सहकार्य करण्यार्या प्राध्यापक महिला प्रतिनिधी डॉ. शेख शहेनाज यांचे विशेष सहकार्य लाभले. सदरील शिबरानंतर दुपारच्या बौद्धिक सत्रामध्ये सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देउन त्यांना अभिवादन करण्यात आले. तद्नंतर हिमायतनगर येथील मनस्वी हॉस्पिटल चे संचालक डॉ मारोती वाकोडे व प्रा. डॉ. शेषराव माने या दोघानीही आपल्या विषयावर सविस्तर मतं मांडली आणि तब्बल दीड तास विध्यार्थ्यीना त्यांनी खिळवून ठेवले.
या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ. एल बी डोंगरे हे लाभले होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमाधिकारी डॉ . शिवाजी भदरगे व डॉ. शेख शहेनाज हे होते. यानंतर मैत्री वर आधारित गीत रोशनी पाईकराव या विध्यार्थ्यीनी गायले. अधक्षीय समारोप नंतर रोशन राठोड रितेश गाडगे विशाल तुंगेवाड, शुभम आदी विध्यार्थ्यीनी अंधश्रद्धेवर आधारित नाटिका सादर करून विध्यार्थ्यीचे मनोरंजन केले. सदरील सत्राचे सुत्रसंचलन मिनहाज यांनी केले तर आभार सत्यभामा काईतवाड यांनी मानले. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.