हिमायतनगर। हुतात्मा जयवंतराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे मंगरुळ येथे सात दिवसीय विशेष निवासी शिबिराचे आयोजन रविवार दि. 11 फेब्रुवारी ते शनिवार दि. 17 फेब्रुवारी 2024 यादरम्यान आयोजित करण्यात आले आहे. मंगळवार दि. 13 फेब्रुवारी रोजी शिबिरामध्ये सकाळी दैनंदिन दिनचर्याच्या नंतर योगासने प्राणायामानंतर सकाळी 8:00 वाजता महिला जनजागरण अभियान रॅली काढून महिलांना आरोग्य तपासणी शिबिराचे येण्यासाठी चे आवाहन विध्यार्थ्यांनी केले. आणि तद्नंतर 09 ते 11 तब्बल दोन तास शिबिरार्थ्यानी श्रमदान करून विध्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.

सकाळी 11 ते दुपारी 02 वाजेपर्यंत मौजे मंगरूळ येथील जवळपास 250 महिलांची चिकल सेल सह अनेक वेगवेगळ्या रक्तातील तपासण्या अरण्यात आल्या. जि प प्राथमिक शाळा मंगरूळ येथील 80 हुन अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यासाठी हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयाचे डॉ. रोहिनी राठोड मॅडम, समुपदेशक श्री साबळे साहेब, प्रयोगशाळा तंत्रज्ञ चिंचोर्डी श्री जाधव साहेब, समन्वयक श्री चव्हाण एस . एस., आरोग्य सेविका श्रीमती दवणे मॅडम महालॅबचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री सुहास साहेब, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आकाश साहेब आदींचे विशेष सहकार्यातून महिला आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या प्रसंगी डॉ. रोहिनी राठोड मॅडम, श्री साबळे साहेब, तसेच श्री चव्हाण आहेत आदी नी तपासणीसाठी आलेल्या महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.

या शिबिराच्या उद्घाटनाचे अध्यक्ष यासाठी महाविद्यालयाच्या आमच्या मार्गदर्शिका प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे तथा सहकार्यक्रमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे यांना सहकार्य करण्यार्या प्राध्यापक महिला प्रतिनिधी डॉ. शेख शहेनाज व प्रा. वसुंधरा तोटावाड यांचे विशेष सहकार्य लाभले.

सदरील महिला आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन्क व अध्यक्ष मंगरूळ चे सरपंच प्रतिनिधी श्री बालाजी पावडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून उपसरपंच श्री संतोष अंबेकर हे होते. तसेच तपासणी साठी आलेल्या गावातील अन्य महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदरील शिबिराला यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. या महिला आरोग्य तपासणी शिबिराचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले तर आभार सहकार्यक्रमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे यांनी मानले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version