नांदेड। महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी पतपेढी ची सध्या निवडणूकी चालु आहे.या निवडणूकीत एकुण 27 उमेदवार असून यामध्ये सामाजिक कार्यात नेहमी पुढे असणारे उमेदवार श्री विजय चव्हाण यांचीच चर्चा जोरात मतदारा मध्ये आहे.
त्याला कारणही तसेच आहे.
दारू मटणाच्या पार्ट्यांच्या व खोट्या आश्वासनाच्या काळात विजय चव्हाण यांनी त्याग, सेवा, सभासदांचे व पतपेढीचे हीत या वैचारिक भूमिका मांडतच आपलं वेगळेपण दाखवून दिले आहे.
या निवडणूकीत विजय झाल्या नंतर संचालक म्हणून दरमहा मिळणार मानधन न घेता ते मानधन व वैयक्तिक रु.5000/- मृत सभासदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्याचा आदर्श निर्णय यावेळी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळेच सभासदांच्या मना मनात त्यांनी घर केलं आहे.
प्रत्येक सभासद आप-आपसात एक मत गुलाब 🌹 या त्यांच्या निशाणी वर मारणार अशीच चर्चा करीत आहेत.श्री चव्हाण यांनी मानधन न घेण्याचे आवाहन बाकीच्या ही उमेदवारांना केलं आहे पण त्यांच्या या चांगल्या आव्हानाला अजूनही कोणी प्रतिसाद दिलेला दिसून येत नसला तरी संपूर्ण जिल्हातील मतदारांला हा निर्णय आवडल्याचे दिसून येत आहे.यातुनच त्यांचा विजय निश्चती मानला जात आहे.