नांदेड। नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरु असून या विकास कामांची आ. मोहनराव हंबर्डे यांनी संबंधित अभियंत्यांसोबत पाहणी करून कामाचा आढावा घेत आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
नांदेड दक्षिणधील वडगांव फाटा, वाजेगाव, मिश्री पिंपळगाव पूल नं 1,मिश्री पिंपळगाव पूल 2, वडगांव शिव रस्ता नवीन पूल आदी विकास कामे सुरु आहेत. या कामाचा दर्जा, गुणवत्ता तसेच आवश्यक तेथे सुधारणा आदी बाबींचा आढावा घेण्यासाठी आमदार मोहन आण्णा हंबर्डे यांनी या भागाचा पाहणी दौरा केला. संबंधित विभागाच्या अभियंत्यांसोबत आमदार हंबर्डे यांनी पाहणी केल्यामुळे या कामांना गती मिळणार आहे. त्यांच्यासोबत कनिष्ठ अभियंता संतोष डामले, उप अभियंता हणमंत पाटील, उपाभियंता संतोष नाईक,सहाय्यक रोहित तोंडले,माजी सरपंच बालाजी पुयड पिंपळगाव मिश्री,बळी पुयड, सरपंच वडगांव. आदींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे पिंपळगाव मिश्री, वडगाव शिव रस्ता व पुलाचे काम सुरु करण्यापूर्वीच आ. मोहनराव हंबर्डे यांनी जायमोक्यावर जाऊन पाहणी केली.
याशिवाय तुप्पा ते गोपाळ चावडी रस्त्याची तसेच कवठा येते नवीन न्यायलय इमारत-1 तसेच न्यायालय इमारत-2 चे बांधकाम, जामगा शिवणी येथील पुलाचे काम आदी कामांची गुणवत्ता व दर्जा तपासणी करून काम योग्य पद्धतीने होत असल्याची खात्री करून घेतली. कोट्यवधी रुपये खर्च करून होत असलेले बांधकाम दर्जेदार स्वरुपाचे व्हावे, अशा सूचना आ. मोहनराव हंबर्डे यांनी या पाहणी दौर्यात संबंधित अभियंत्यांना केल्या.