कर्म चांगले असले पाहिजे – हभप काटे महाराज
नवीन नांदेड| कर्म चांगले असले पाहिजे, आपसातील मतभेद विसरून एकत्र येत काल्याचा किर्तन मध्ये सहभागी झाले पाहिजे असे सांगुन एकनिष्ठ मराठा समाजासाठी आरक्षणा साठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे समाजानी ऊभे राहावे असे हभप आशिष काटे महाराज यांनी तूप्पा येथे आयोजित मुर्ती स्थापना सातव्या वर्धापन दिन सोहळा निमित्ताने आयोजित काल्याचा किर्तन सोहळा प्रसंगी केले.
तुप्पा ता. जि. नांदेड येथे मुर्ती सोहळा वर्धापन दिन निमित्ताने ११ ते १८ डिसेंबर रोजी अखंड हरिनाम सप्ताह व अखंड हरिनाम कीर्तन आयोजित करण्यात आले होते,दैनंदिन काकडा,ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम चरित्र, हरिपाठ भजन, यासह धार्मिक कार्यक्रम आयोजन केले होते, यावेळी हभप किशन महाराज बरबडेकर, हभप भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर, दभप आंनदबन महाराज, हभप बाबु महाराज कांकाडीकर, हभप विलास महाराज गजगे बोथीकर,हभप चंद्रकांत महाराज ऊसमानगर, हभप आशिष महाराज काटे यांच्ये किर्तन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी हभप आशिष महाराज काटे यांनी १८ डिसेंबर रोजी काल्याचा किर्तन मध्ये त्यांनी भारतीय सांस्कृति यासह देव देवता यांनी दिलेल्या अनेक दृष्टांत व भगवान परमात्मा यांच्यी अनेक ऊदाहरणे दिले, समाजासाठी एकनिष्ठ असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या बाबतीत समाजाने खंबीरपणे पाठीमागे उभे टाकले पाहिजे असे सांगितले,या नंतर महाआरती व महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताह व अखंड हरिनाम किर्तन सोहळा सागंता झाली, टाळकरी मृदंग वादक यांनी साथ संगत केली.
यावेळी गावातील महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक, मुले यांच्या सह दतभप आंनदबन महाराज तुप्पा,संरपच सौ. मंदाकिनी यन्नावार, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कदम, चिमणाजी पाटील,बबनराव कदम, ग्रामपंचायत सदस्य, गावातील सामाजिक, राजकीय, व विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संयोजन, आयोजक, व गावकरी यांनी परिश्रम घेतले.