ज्येष्ठ नागरिकांच्या शिबीरास उदंड प्रतिसाद
नांदेड| सकाळी 10 वाजताच गरजवंत ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ सुरू झाली होती. स्वा.सैनानी डॉ.दादारावजी वैद्य सभागृह तुडुंब भरून ओसांडले. शिबिराची सुरूवात शिवानंद निमगीरे (समाज कल्याण सहआयुक्त), बापू दासरी (समाज कल्याण अधिकारी), ब्याऐंशी वर्षीय सुभाष बार्हाळे, सौ.निर्मलाताई बार्हाळे, डॉ.शीतलताई भालके, शततारका पांढरे, माधवराव पवार, प्रभाकर रावजी कुंटूरकर, भूताले, अदि. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलानानीं झाली.
शिबीरास श्री.व सौ.तेरकर, श्री.व सौ.सोमवाड, डॉ.पुष्पा कोकीळ, श्रीमती पुष्पा मदनूरे, श्रीमती प्रभा चौधरी, मिर्झा बेग, सुभाष त्रिपाठी, सैयद मौला, शहरी व ग्रामिण भागातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संक्षिप्त प्रास्ताविक डॉ.हंसराज वैद्य यांनी केले. शिवानंदी मिनगीरे व बापू दासरी यांच्या मार्गदर्शनानी ज्येष्ठ नागरिक तृप्त झाले. नांदेडचे संवेदनशील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे प्रशासन ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी असल्याचे शिवानंदजी निमगिरे, समाज कल्याण सह आयुक्त यांनी सांगीतले.
ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे सार्वजणिक प्रश्न असोत वा वैयक्तिक प्रश्न असोत, घरगुत्ती असोत की संरक्षणात्मक असोत प्रशासनाच्यावतीने ज्येष्ठांना त्वरित सहाय केले जाईल. त्यांना न्याय दिला जाईल असे सांगीतले. आयुष्यमान भव व आ.भा.प्रमाण पत्राचे महत्व विषद करून आजच्या शिबिरात सर्व गरजवंत ज्येष्ठ नागरिकांना संध्याकाळी उशीरापर्यंत जरी आयुष्यमान भव प्रमाण पत्र देऊ शकलो नाहित तरी पुढच्या शिबीरात आम्ही देण्याची इथेच निश्चित सोय करून देऊ असे आश्वासन दिले. त्यांनी शिबीराची अस्थेने पहाणी करून समाधान व्यक्त केले. माध्यमांशीही संपर्क साधला. जनतेला संबोधित केले.
बर्ऱ्याच गरजवंत ज्येष्ठ महिला पुरूष नागरिकांना गर्दीमुळे व रॅशन कार्ड अभावी आज “आयुष्यमान भव” प्रमाण पत्र जर देता आले नाही तर त्यांना पुढच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी (दि.3/12/23 रोजी) समाज कल्याण आयुक्तालयाच्या सहायाने देण्यात येणार असल्याचे डॉ.हंसराज वैद्य यांनी सांगीतले. या शिबिरात महिला ज्येष्ठ नागरिकाध्यक्ष डॉ.शीतल भालके यांच्या नेतृत्वाखाली डॉ.प्रतिभा संकेत वैद्य, सर्व डॉ.साक्षी, सोनाली, अकाश, सुमय्या, दिपाली, जवेरिया, राहत, गीतांजली अदिनीं मोलाचे सहकार्य केले. मेडले, मेयर आणि गुफिक हेल्थ केअरनीं मुबलक औषधी पुरवठा करून सहकार्य केल्याचे संयोजक डॉ.हंसराज वैद्य यांनी सांगीतले.