नांदेड। दिनांक 07.04.2024 रोजी नांदेड पोलीस दलातर्फे सद्भावना/एकता रॅली श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली सदभावना / एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर सदभावना / एकता रॅलीला मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पोलीस अधिक्षक कार्यालय येथून हिरवा झेंडा दाखवुन सुरूवात केली.

पोलीस मित्र आणि वेगवेगळ्या शाळेचे, महाविद्यालयाचे, आर्युवेदिक कॉलेज, केंब्रीज विद्यालय, महात्मा फुले हायस्कुल, एन.सी.सी. राजश्री शाहु विद्यालय, केंद्रिय विद्यालय पोलीस कॅडेट, एम.एस.सी. आय.टी. इन्स्टीटयुट केंद्र चालक नांदेड जिल्हा, नाटय नाद बहुउद्देशिय सेवाभावी पथनाटय संस्था नांदेड, राम मोहन लोहिया कला पथक, पंचकृष्ण भजनी मंडळ सोमठाणा, पत्रकार, नांदेड शहरातील सर्व पोस्टेचे पोलीस स्टेशन प्रभारी व शाखा प्रभारी तसेच क्युआरटी, आरसीपी, पोलीस मुख्यालय येथील अंमलदार, तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. सदरची सदभावना / एकता रॅली ही पोलीस अधिक्षक कार्यालय येथुन सकाळी 08.30 वा. सुरू होवुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे महात्मा गांधी पुतळा येथे 10.30 वा. सांगता झाली.

या प्रसंगी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी स‌द्भावना/एकता रॅली मध्ये भाग घेतलेल्या तरूणांना जात, वंश, धर्म, भेद न करता सर्व भारतीय जनतेने भावनिक ऐक्य आणि सांमजस्य ठेवतील तसेच आदर्श आचार संहितचे पालन करून आगामी येणारे सर्व सण / उत्सव सर्वांनी ऐकोपाने साजरे करावे असा संदेश दिला. (Whats App, Facebook, Instagram, Twitter) इत्यादी सोशल मिडीयावर सोशल मीडियाच्या माध्यमातुन आक्षपार्ह धार्मीक भावाना दुखावणारे पोस्ट / शेअर/फॉरवर्ड / टिप्पणी करू नये असे आवाहन केले अन्यथा कार्यवाही केली जाईल असे सांगितले. यावेळी शिख धर्मगुरू श्री बाबा बलविंदर सिंगजी, बौध्द धर्मगुरू भंते श्री पयाबोधी, मुस्लीम धर्मगुरू मौलाना नुरुल हस्नैन, श्री शशीकांत पाटील, विश्व हिंदु परिषद हे हजर होते त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व नांदेडकरांना धार्मीक एकता टिकवण्याचे आवाहन केले तसेच नाटय नाद बहुउद्देशिय सेवाभावी पथनाटय संस्था नांदेड यांनी आपले पथनाटयातुन, राम मोहन लोहिया कला पथक यांनी आपले कलेतुन, पंचकृष्ण भजनी मंडळ सोमठाणा यांनी आपले भजनातुन व शालेय विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पोशाख धारन करून हातात हम सब एक है एक चे फलक घेवून धार्मीक एकता राखण्याचा संदेश दिला.

सदर सद्भावना/एकता रॅली करीता मा. श्री अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, नांदेड, मा. श्री महेशकुमार डोईफोडे, आयुक्त महानगरपालिका नांदेड, श्रीमती मिनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद, नांदेड मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, श्रीमती किरतिका सी.एम., सहा पोलीस अधिक्षक, पोलीस उप विभाग नांदेड शहर, श्रीमती डॉ अश्विनी जगताप, पोलीस उप-अधिक्षक (मु), मा. श्री. उदय खंडेराय, पोनि स्थागुशा, मा. श्री जगदीश भंडरवार, पोनि आर्थिक गुन्हे शाखा, नांदेड मा. श्री विजय धोंडगे, रापोनि पोलीस मुख्यालय, नांदेड, श्री नौशाद पठाण, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड यांनी सहभाग नोंदवला.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version