नांदेड। दिवंगत देविदास डंबारे सचिन कलाव नृत्य अकॅडमी बहुउद्देशीय संस्था वर्धा यांच्यातर्फे राष्ट्रीय नृत्य स्पर्धा व महोत्सव नृत्योत्सव या नावाने दहा व अकरा फरवरी 2024 रोजी वर्धा येथे आयोजित करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामधून विविध जिल्ह्यांचे व देश पातळीवर विविध राज्यांचे स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांना प्रदर्शित केलं.
या स्पर्धेमध्ये एकल जुगल समूह अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये नांदेड येथील प्रसिद्ध नृत्य अकॅडमी असणारी लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सहभाग नोंदवून उत्तम कामगिरी केली यामध्ये आराध्या पाईल या विद्यार्थिनींन पाश्चात्य नृत्य करून द्वितीय पारितोषिक प्राप्त केले तर पहल राठी हिने लावणी नृत्य सादर करून प्रथम पारितोषिक प्राप्त केले यासोबतच लहान वयोगटात अगदी पाच वर्षाची मुली असणारी मायरा अडकटलवार हिने उत्तमरीत्या मीरा मंचावर सादर केले व कंटेम्पररी या भागातून तृतीय पारितोषिक प्राप्त करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
यासोबतच लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या संचालिका डॉ. सान्वी जेठवाणी यांना गुरु अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आला सदरील सन्मान विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करून भारताची लोक परंपरा व शास्त्रीय परंपरा जीवित ठेवण्याचे काम करत असल्याकारणाने त्यांना बहाल करण्यात आल्याचे प्रतिपादन आयोजकांनी मंचावरून केलं.
सदरील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून शुभम भिरकुरे व विजय चव्हाण यांनी नृत्यदिग्दर्शन केले. सर्व विजेत्यांचे अभिनंदन सप्तरंग सेवाभावी संस्था चे सचिव अक्षय कदम, कोषाध्यक्ष लक्ष्मणराव कदम व सदस्य गणेश चांडोळकर, दीपक प्रेमचंदाणी, नईम खान, गिता वैजवाडे यांनी केले.