नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे रमणवाडी तांडा येथे फिर्यादीचे राहाते घरी चार आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादीच्या २० वसरशीय मुलीस आरोपी युवकाने लग्नाचे अमिश दाखवून प्रेम करून लग्न करतो असे वारंवार सांगुन दुसरीकडे सोयरीक करून घेतली. पुन्हा पिडीत मुलीस त्रास दिला आणि इतर आरोपीतांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांचे त्रासाला कंटाळुन पीडित मुलीने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. तिला आत्महत्या करण्यास आरोपीतांनी प्रवृत्त केल्याची फिर्यादी मुलीच्या नातेवाईकाने दिल्यावरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध कलम 306, 34 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बी. डी. भूसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव मॅडम हे करीत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे रमणवाडी तांडा येथील सुदाम शामराव जाधव वय ४५ वर्षे धंदा शेती रा रमणवाडी ताडा, ता. हिमायतनगर यांनी पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे हजर होऊन दिलेला जबाब प्रमाणे, ते वडील, आई, पत्नी, मुलगी व एक मुलगा असा परिवारासह गेल्या १५ वर्षांपासून एकत्र कुटुंब पद्धतीने राहत आहेत. कुटुंबाचा उदार निर्वाह शेती करून करता आहेत. मयत मुलगी जयश्री हिने पाचवी पर्यंत शिक्षण घेऊन तिने शाळा सोडली आहे मुलगा गोकुळ हा ईयत्ता दहावीला आहे. गेले दोन ते तीन वर्षापासुन याच तांड्यातील पवन ऊर्फ राजु सुभाष आडे व फिर्यादीच्या मुलीचे प्रेमसंबंध जुळले. तो नेहमी तिला भेटत असत व त्याचा मोबा 8605384210 वरुन मयत मुलगी जयश्री हीचे मो. न. 7559418373 फोनवर देखील बोलत होते. तसेच व्हॅट्सऍपवर व्हीडीओ कॉल देखील करत होते.
दीवाळीचे वेळी पवन ऊर्फ राजु सुभाष आडे याची फिर्यादीच्या मुलीसाठी सोयरीक आली होती परंतु त्यांनी हुडा जास्त मागल्याने व फिर्यादीकडे एवढे पैसे नसल्याने त्यांनी सोयरीक केली नाही. त्यावेळी त्या मुलाचे वडील सुभाष आडे यांनी फिर्यादीला आम्हाला भीकारी लोकासोबत सोयरीक करायची नाही असे सांगून त्यांनी मुलाची दुसरीकडे सायरीक करून घेतली होती. फिर्यादीच्या मुलीची सोयरीक झाली नाही तरी राजू हा वारंवार फीर्यादीच्या मुलीला फोन करून परेशान करत होता. त्याला खूप वेळा सांगीतले व मुलीने देखील त्याला सांगीतले कि आपली सोयरीक झाली नाही. मला फोन करु नको तरी देखील तो फोनकरून फिर्यादीच्या मयत मुलीला नेहमी त्रास देल होता. मयत मुलीने त्याच्या त्रासाला कंटाळून घरच्यांना देखील सागीतले होते कि, पवन ऊर्फ राजू आडे हा मला त्रास देत आहे. त्यावेळी घरच्यांनी मुलीस समजावून सांगितले. तरी देखील राजु हा मुलीला फौन करायचा दि. 09/01/2024 रोजी सकाळी 09 वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या मयत मुलीस दिलीप दावजी आडे, सुभाष देवला आडे व सोनु दिलीप आडे यानी मयत मुलीस जिवे मारण्याची धमकी दिली आणि तुला आम्ही फुकुन टाकतो दिवसा दुपारी फुकुन टाकावी अशी धमकी देखील दिली होती.
दरम्यान दि. 11/01/2024 रोजी फिर्यादी व त्यांची पत्नी शेतात कामाला गेलो होते व मुलगा गोकुळ हा शाळेत हिमायतनगर येथे गेला होता. दरम्यान मुलगी व तिचे आजी आजोबा घरी होते. दुपारी अदाजे १ वाजेच्या सुमारास फिर्यादीचा भाउ लोकचंद अनील जाधव याने फोनकरुन सागीतले कि, मुलीने राहते घरी गळफास घेतली आहे, असे समजताच दोघे पती पत्नी तात्काळ घरी आली. घरात आतील रुममध्ये जावून पाहील असता मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या अवस्थेत लटकलेली दिसली. याची माहिती हिमायतनगर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी दाखल होऊन मयत मुलीस सरकारी दवाखान्यात आणले असता डॉक्टरानी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
पवन उर्फ राजू सुभाष आडे याने प्रेम करुन लग्न करतो असे वारंवार सांगुन दोन महीन्यापूवी दुसरीकडे सोयरीक करून घेतल्याने माझी मुलगी हीस राजु आडे याने प्रेम करुन फसवल्याने वारंवार फोनवरून त्रास दिल्याने तसेच मुलीस जीवे मारण्याची धमकी देऊन दिवसा दुपारी फुकुन टाकतो असे धमकी देखील दिली होती. या त्रासाला कंटाळुन तिने गळफास लावुन दि. 09/01/2024 रोजी सकाळी 09 वाजेचे सुमारास आत्महत्या केली. याबाबत फिर्यादी सुदाम शामराव जाधव, वय ४५ वर्षे, व्यवसाय शेती रा. रमनवाडी तांडा ता. हिमायतनगर जि. नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पवन ऊर्फ राजू सुभाष आडे, सुभाष देवला आडे, दिलीप धावजी आडे, सोनु दिलीप आडे, रा. रणवाडी तांडा तालुका हिमायतनगर हेच जबाबदार असल्याची तक्रार दिल्यावरून हिमायतनगर पोलिसांनी चौघांवर कलम 306, 34 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बी. डी. भूसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव मॅडम हे करीत आहेत.